Swapnil Kusale: कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादखुळा खेळ, पॅरिसमध्ये पटकावलं ऑलिम्पिक पदक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

स्वप्निल कुसळेने पॅरिसमध्ये पटकावलं ऑलिम्पिक पदक!
स्वप्निल कुसळेने पॅरिसमध्ये पटकावलं ऑलिम्पिक पदक!
social share
google news

Paris Olympics 2024 Swapnil Kusale bronze medal: पॅरिस: क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभ असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (1 ऑगस्ट) चमक दाखवत आहेत. मराठमोळा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकलं. भारताने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक पटकावलं आहे. याआधी नेमबाज मनू भाकर एक वैयक्तिक आणि दुसरं टीम इव्हेंटमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर आता कोल्हापूरच्या पठ्ठ्याने नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केलं आहे. (paris olympics 2024 kolhapur athlete swapnil kusale creates history in shooting wins bronze in 50m rifle 3 Positions event)
 
दरम्यान, नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, तिरंदाजी, गोल्फ, हॉकी, नौकानयन अशा स्पर्धांमध्ये भारताचे अॅथलिट हे सहभागी होत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Paris Olympic 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एकही पदक जिंकले नसले तरी तो दिवस भारतासाठी खूप चांगला होता. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी विजय नोंदवला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नेमबाजी आणि तिरंदाजीतूनही चांगली बातमी आली आहे. 

स्वप्निलने रचला मोठा इतिहास

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये मोठा इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी भारताने शेवटची दोन्ही पदकं ही नेमबाजीतूनच मिळवली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Paris Olympic 2024 : मनू भाकर-सरबजोत जोडीचा 'कांस्य' वेध! भारताच्या खात्यात दुसरं पदक

अंतिम फेरीत पोहचलेला स्वप्निल कुसाळे हा सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हा क्रमवारीत खाली होता. पण नंतर मात्र, त्याने जबरदस्त पुनरागमन करत कांस्य पदाची कमाई केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT