फोन करा आणि वाद संपवून टाका, Virat vs BCCI वादावर कपिल देव यांचं मत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील कथित वादाबद्दल, विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय आणि विराट कोहलीने आपापसात चर्चा करुन यावर मार्ग काढायला हवा. दोघांसाठीही देश पहिला यायला हवा आणि बाकीचे सर्व मुद्दे नंतर, अशी प्रतिक्रीया कपिल देव यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

बीसीसीआय आणि विराटमधल्या विसंवादावर त्यादरम्यान अनेक बातम्या समोर आला. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सौरव गांगुली विराट कोहलीला त्या पत्रकार परिषदेसाठी कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत होता.

गांगुलीनेही कधी विश्वचषक जिंकला नाही, तेंडुलकरलाही…; रवि शास्त्रींकडून कोहलीचा बचाव

हे वाचलं का?

काय होता नेमका वाद? जाणून घ्या…

युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाआधी विराटने आपल्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीला टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नको असं सांगितलं असं स्पष्टीकरण दिलं. परंतू विराटने सौरव गांगुलीचं हे वक्तव्य खोटं ठरवून एका अर्थाने थेट बीसीसीआय अध्यक्षालाच आव्हान दिलं होतं.

ADVERTISEMENT

या संपूर्ण मुद्द्यावर कपिल देव यांनी द विक मासिकाला मुलाखत दिली. “आजकाल खरंतरं आपण अशा गोष्टींनी हैराण व्हायला नको. ज्यावेळी विराटने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं त्यावेळी कोणीही असा विचार केला असेल का की त्याच्या मनात इतकं काही सुरु आहे. कोणालाही विराटने कर्णधारपद सोडलेलं नको होतं. तो एक चांगला खेळाडू आहे, परंतू त्याच्या निर्णयाचा आपण आदर करायला हवा. हा मुद्दा आता लवकर निकालात लागायला हवा. दोघांनीही एकमेकांचे फोन उचला, बोला आणि विषय संपवून टाका. देश आणि भारतीय संघ हा तुमच्या दोघांपेक्षाही पुढे येतो.”

ADVERTISEMENT

सुरुवातीच्या काळात मलाही सर्वकाही मिळालं. परंतू कधी कधी तुम्हाला जे हवं असतं ते मिळत नाही. परंतू याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कर्णधारपद सोडावं. विराट एक शानदार खेळाडू आहे आणि मला त्याला क्रिकेटमध्ये अजुन खेळताना पहायचं आहे. विशेषकरुन विराटने कसोटी क्रिकेटमध्ये अधिक धावा करताना मला पहायचं असल्याचंही कपिल देव म्हणाले.

मध्यंतरी सौरव गांगुली विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. परंतू गांगुलीने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने कसोटी मालिका १-२ ने गमावलव्यानंतर विराटने आपल्या कसोटी संघाचाही राजीनामा दिला आहे.

विराटला कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने फेटाळलं ‘ते’ वृत्त

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT