IPL 2021 चे सर्व सामने थांबवा, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना आयपीएलच्या सामन्यांना संधी मिळते तरी कशी असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्यातच सोमवारी KKR च्या संघाचे दोन तर CSK च्या संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळालं आहे. अशा परिस्थितीत दिल्ली हायकोर्टात यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने रद्द करा आणि दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करा अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे.

ADVERTISEMENT

लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असतानाही आयपीएलच्या सामन्यांना परवानगी कशी मिळाली याची चौकशी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. करन ठकराल आणि इंदर मोहन सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे. “दिल्ली आणि देशात सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकार, बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल, DDCA, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामन्यांना परवानगी देणं हे अयोग्य आहे.” याचिकाकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

IPL 2021 : KKR पाठोपाठ CSK च्या गोटात कोरोनाचा शिरकाव, ३ सदस्यांना झाली लागण

हे वाचलं का?

दिल्लीत लोकं हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी झगडत आहेत. स्मशानभूमी भरुन गेली आहे. ऑक्सिजनचे सिलेंडर मिळत नाहीयेत, लोकांना औषधं मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीत आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करणं म्हणजे जी लोकं कोरोनाचा सामना करत आहेत अशा लोकांच्या मानसिक आरोग्याशी खेळ करण्यासारखं असल्याचं मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलंय. दिल्लीतील लोकांसाठी फिरोजशहा कोटला मैदानाचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावं अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT