मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, मला टॅग करणं थांबवा ! भारताचा गोलकिपर अमरिंदरची मीडियाला विनंती
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये सुरु झालेलं राजकीय नाट्य अखेरीस थांबलं आहे. या घडामोडीचं वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांमध्ये कॅप्टन अमरिंदर यांना ट्विटरवर टॅग करण्यासाठी चढाओढ लागली होती. परंतू या चढाओढीत काही प्रसारमाध्यमांनी चुकीच्या व्यक्तीला टॅग केलं आहे. हा चुकीचा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून भारतीय फुटबॉल संघाचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. आज अखेरीस […]
ADVERTISEMENT
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये सुरु झालेलं राजकीय नाट्य अखेरीस थांबलं आहे. या घडामोडीचं वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांमध्ये कॅप्टन अमरिंदर यांना ट्विटरवर टॅग करण्यासाठी चढाओढ लागली होती. परंतू या चढाओढीत काही प्रसारमाध्यमांनी चुकीच्या व्यक्तीला टॅग केलं आहे.
ADVERTISEMENT
हा चुकीचा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून भारतीय फुटबॉल संघाचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. आज अखेरीस अमरिंदरने आपल्या सोशल मीडियावरुन प्रसारमाध्यमांना विनंती करत मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, मला टॅग करणं थांबवा अशी विनंती केली आहे.
Dear News Media, Journalists, I am Amrinder Singh, Goalkeeper of Indian Football Team ?? and not the Former Chief Minister of the State Punjab ?? Please stop tagging me.
— Amrinder Singh (@Amrinder_1) September 30, 2021
महत्वाची गोष्ट म्हणजे खुद्द कॅप्टन अमरिंदर यांनीही या ट्विटची दखल घेत, तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो. पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असं म्हटलंय.
हे वाचलं का?
I empathise with you, my young friend. Good luck for your games ahead. https://t.co/MRy4aodJMx
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 30, 2021
पंजाबमध्ये राजकीय नाट्यानंतर प्रत्येक जण ट्विटरवर अमरिंदर सिंगला टॅग करत होते. हा घोळ अमरिंदर आणि कॅप्टन अमरिंदर यांच्या ट्विटर हँडलमुळे होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचं ट्विटर हँडल @capt_amarinder असं असून फुटबॉलपटू अमरिंदरचं ट्विटर हँडल @Amrinder_1 असं आहे.
अमरिंदर सिंग हा भारतीय फुटबॉल संघ आणि ATK मोहन बागान संघाकडून खेळतो. १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या SAFF चॅम्पिअनशीपआधी अमरिंदरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. अमरिंदरच्या जागी भारतीय संघात धीरज सिंगला जागा मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT