Avesh Khan : IPL ऑक्शनआधीच मोठा करार! राजस्थानकडून 10 करोडमध्ये ‘हा’ खेळाडू खरेदी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rajathan royals lucknow super giants trade avesh khan devdutt padikkal ipl 2024 auction
rajathan royals lucknow super giants trade avesh khan devdutt padikkal ipl 2024 auction
social share
google news

Rajasthan Royals Lucknow Super Giants Trade, Avesh khan Devdutt Padikkal : आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर आता क्रिकेट फॅन्सना IPL 2024 च्या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेला अजून खूप अवधी आहे. तत्पुर्वी खेळाडूंचे ऑक्शन सुरु आहे. त्यानुसार राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आता लखनऊ सुपर जाएंटशी (Lucknow Super Giants)  एक करार केला आहे. या करारात राजस्थानने देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) या खेळाडूच्या बदल्यात गोलंदाज आवेश खानला (Avesh khan) आपल्या ताफ्यात घेतला आहेत. 1O करोड रूपयात राजस्थानने आवेश खानला खरेदी केले आहे. त्यामुळे आवेश खान राजस्थान संघाकडून आयपीएल खेळताना दिसणार आहे. (rajasthan royals lucknow super giants trade avesh khan devdutt padikkal ipl 2024 auction)

ADVERTISEMENT

आयपीएल ऑक्शनआधीच राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये करार झाला आहे. या करारात राजस्थानने फलंदाज देवदत्त पडिक्कलच्या बदल्यात वेगवान गोलंदाज आवेश खानला त्यांच्या ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाची या कराराला मान्यता आहे. फक्त या करारावर बीसीसीआयची मोहोर उमटवायची बाकी आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?

इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, आवेश खानला लखनऊने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 10 करोडला खरेदी केले होते. तर राजस्थानने देवदत्त पडिक्कलला 7.75 करोडला खरेदी केले होते. दोन्ही खेळाडूंना यावर्षी त्यांच्या संघानी रिटेन केले होते. मात्र आगामी सीझनमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

आयपीएल 2024 च्या आधी झालेला हा दुसरा ट्रेड आहे. याआधी मुंबई इंडियन्सने लखनऊकडून रोमारिया शेफर्डला घेतले होते. दरम्यान आयपीएल 2024 चे ऑक्शन 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. याआधी 26 नोव्हेंबरला सर्व संघानी त्यांनी केलेल्या रिटने आणि रीलीज केलेल्या खेळाडूची माहिती द्यावी लागेल. तर लखनऊने आगामी सीझनआधी अनेक बदलाव केले आहेत. जस्टिन लेंगर टीमचा नवीन कोच असणार आहे. गौतम गंभीर मेंटॉर पद सोडून कोलकत्ता नाईट राईडर्स सोबत गेला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Viral Video : दोघींचा एकावरच जीव जडला, चहाच्या टपरीवर तुफान भिडल्या!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT