अति क्रिकेट आणि Bio Bubble मुळे टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये पराभव? रवी शास्त्री म्हणतात…

मुंबई तक

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर अनेक नाराज भारतीय चाहत्यांनी आयपीएलच्या आयोजनाला याचा दोष दिला. काही खेळाडूंनीही गेले ६ महिने आपण घराबाहेर असून Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल भाष्य केलं होतं. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. “होय नक्कीच, प्रश्नच येत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर अनेक नाराज भारतीय चाहत्यांनी आयपीएलच्या आयोजनाला याचा दोष दिला. काही खेळाडूंनीही गेले ६ महिने आपण घराबाहेर असून Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल भाष्य केलं होतं.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“होय नक्कीच, प्रश्नच येत नाही. यापैकी अनेक खेळाडू हे ६ महिने झाले घरीच गेले नाहीयेत. गेल्या दोन वर्षांमध्ये हे खेळाडू जास्तीत जास्त २५ दिवस आपल्या घरी राहिले असतील. खेळाडू देखील माणसंच आहेत. ज्यावेळी तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यावेळी महत्वाच्या क्षणांमध्ये तुमच्यातली उर्जा निघून जाते. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात नेमकं हेच झालं.” बायो बबलच्या थकव्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला का या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री बोलत होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळायला गेलेली टीम इंडिया त्यानंतर इंग्लंड दौरा, आयपीएल असा भरगच्च कार्यक्रम समोर ठेवून खेळली. ज्यामुळे अनेक खेळाडूंना आलेला थकवा टी-२० विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यांमध्ये दिसून आला.