IPL 2021 चा उर्वरित हंगाम भारतात खेळवण्याची शक्यता कमीच – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम स्थगित केला आहे. BCCI सध्या उर्वरित हंगाम कोणत्या कालावधीत खेळवता येईल याची चाचपणी करत आहे. इंग्लंडमधील काऊंटी संघांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा उर्वरित हंगाम आपल्या देशात खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिल्याचं कळतंय. परंतू बीसीसीआयने अद्याप याबद्दल निर्णय घेतलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता…आयपीएलचा उर्वरित हंगाम भारतात खेळवला जाण्याची शक्यता कमीच असल्याचं मत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

इंग्लंडमध्ये World Test Championship पार पडल्यानंतर आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे का असं प्रश्न विचारला असता गांगुलीने त्याला नकारार्थी उत्तर दिलं. “नाही, WTC नंतर टीम इंडिया श्रीलंकेत जाणार आहे. ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. आयपीएल आयोजनाच्या दृष्टीकोनातून अनेक अडचणी आहेत…उदा. १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी. भारतात हे आता शक्य होणार नाही. हे क्वारंटाईन कालावधी सांभाळणं खूप कठीण असतं. त्यामुळे आयपीएलसाठी आम्हाला मध्ये कालावधी मिळतो की नाही याबद्दल बोलणं सध्या खरंच कठीण आहे.” गांगुली Sportsstar शी बोलत होता.

IPL 2021 भारतात आयोजित करणं ही चूक नव्हती – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

हे वाचलं का?

“आयपीएल याआधीच स्थगित करायला हवी होती अशा एक ना अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. मुंबई आणि चेन्नईत जे सामने झाले तिकडे एकही केस सापडली नाही. दिल्ली आणि अहमदाबाद शहरात सामने सुरु झाल्यानंतर कोरोनाच्या केसेस वाढल्या. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो लोकं बोलणार हे ठरलेलंच आहे. इंग्लिश प्रिमीअर लिग स्पर्धेत आतापर्यंत अनेकदा खेळाडू पॉजिटीव्ह आढळले आहेत, पण त्यांनी सामना रिशेड्युल केला. परंतू आयपीएलमध्ये हे शक्य नाहीये. जर कोरोनाच्या केसेस आढळल्या नसत्या तर आम्ही स्पर्धा सुरु ठेवली असती. खेळाडू हे बायो सिक्युअर बबलमध्ये होते, प्रेक्षकांना मैदानात परवानगी नव्हती. पण ज्या क्षणी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आम्ही लगेच स्पर्धा स्थगित केली. जगभरात ज्या स्पर्धा सुरु आहेत त्या पाहा, तिकडे कोरोनाचे रुग्ण आढळूनही सामने सुरु आहेत.”

उर्वरित सिझन आमच्या इथे आयोजित करा, IPL 2021 साठी BCCI ला पहिली ऑफर

ADVERTISEMENT

आयपीएल २०२० मध्ये बीसीसीआयने इंग्लंडच्या Restrata कंपनीला बायो सिक्युअर बबल तयार करण्याचं कंत्राट दिलं होतं. या कंपनीने २०२० चा सिझन यशस्वीरित्या पूर्ण करुन दाखवला होता. परंतू २०२१ साठी या कंपनीला बीसीसीआयने कंत्राट दिलं नाही. भारतात या कंपनीचं फारसं अस्तित्व नसल्यामुळे आम्ही इतर कंपनीचा विचार केल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं. स्पर्धा मध्यावधीत स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयचं सुमारे २ ते अडीच हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय उर्वरित सामन्यांसाठी काय नियोजन करतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT