रोहितचा तो निर्णय, जड्डूची हुकलेली डबल सेंच्युरी; फॅन्स द्रविडवर नाराज…काय घडलं मोहालीत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी सामन्यात, टीम इंडियाने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ वर घोषित केला. रविंद्र जाडेजाची नाबाद शतकी खेळी भारताच्या पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. परंतू या आश्वासक खेळानंतरही पहिल्या कसोटी सामन्याला वादाची किनार लागली आहे. रविंद्र जाडेजाने मोहम्मद शमीसह नवव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.

ADVERTISEMENT

१७५ धावांवर जाडेजा खेळत असतानाच कर्णधार रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला. खरं पहायला गेलं तर रविंद्र जाडेजा त्यावेळी आपलं द्विशतक सहज पूर्ण करु शकला असता. परंतू रोहितने त्यालाही ही संधी न देता डाव घोषित केला.

Ind vs SL : जाडेजाच्या शतकी खेळीमुळे भारताचा धावाचा डोंगर, मोहाली कसोटी सामन्यावर मजबूत पकड

हे वाचलं का?

सोशल मीडियावर फॅन्सनी या घटनेचे धागेदोरे थेट राहुल द्रविडपर्यंत जोडले आहेत. २००४ साली पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटी सामन्यात विरेंद्र सेहवागने त्रिशतक झळकावलं होतं. यावेळी सचिन तेंडुलकरही चांगल्या फॉर्मात होता. सचिनला या सामन्यात द्विशतक झळकावण्याची संधी असताना द्रविडने भारताचा डाव घोषित केला आणि केवळ ६ धावांमध्ये सचिनचं द्विशतक होऊ शकलं नाही. पाहूयात सोशल मीडियावर फॅन्सनी आपल्या भावना कशा व्यक्त केल्या आहेत…

मुलतान कसोटीत सचिनचं द्विशतक होऊ न देता डाव घोषित करणारा राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता. यानंतर मोहाली कसोटीमध्ये राहुल द्रविड भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतो आहे. रविंद्र जाडेजाने मोहाली कसोटीत २२८ बॉलमध्ये १७ चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद १७५ धावा केल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT