Ind vs SL : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात संधी, जाणून घ्या त्याची आतापर्यंतची कामगिरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी रात्री भारतीय संघाची घोषणा केली. ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून यात स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडची या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

ADVERTISEMENT

स्थानिक क्रिकेट ऋतुराज महाराष्ट्राचं तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करतो. IPL 2020 आणि IPL 2021 मध्ये ऋतुराजने आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखवलं आहे. २०१६ पासून ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राच्या संघाचा नियमीत सदस्य आहे. वयाच्या १९ व्या वर्षीत ऋतुराजने महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत २१ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ऋतुराजने १ हजार ३४९ रन्स केल्या असून यात ४ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

BCCI ने श्रीलंका दौऱ्यासाठी केली टीम घोषित, कॅप्टन असणार ‘हा’ खेळाडू

हे वाचलं का?

याव्यतिरीक्त अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही ऋतुराजने ५९ मॅचमध्ये ७ शतकं आणि १६ अर्धशतकांसह २ हजार ६८१ रन्स केल्या आहेत. याव्यतिरीक्त टी-२० क्रिकेटमध्येही ऋतुराजने ४६ सामने खेळले असून त्याच्या नावावर १ हजार ३३७ रन्स जमा आहेत. स्थानिक स्पर्धेतली चांगली कामगिरी पाहिल्यानंतर ऋतुराजला यानंतर भारत अ संघाकडूनही संधी मिळाली. २०१९ साली ऋतुराज देवधर ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीही खेळला. याव्यतिरीक्त भारत अ संघाकडून ऋतुराजने इंग्लंड लायन्स संघाविरुद्धही एक सामना खेळला आहे.

भारत अ संघाकडून खेळत असताना ऋतुराज गायकवाडने श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड दौऱ्यात सर्वांना प्रभावित केलं. श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध तर ऋतुराजने १०० पेक्षा अधिक सरासरीने रन्स काढल्या. याचसोबत गेल्या दोन वर्षांपासून ऋतुराज धोनीच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळतो आहे.

ADVERTISEMENT

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई संघाकडून शेवटच्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराजने अर्धशतक झळकावत अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला होता. आयपीएल २०२१ मध्ये ऋतुराजने चांगली कामगिरी केली असून स्पर्धा मध्यावधीत स्थगित होत असताना ऋतुराजची कामगिरी आश्वासनीय राहिली आहे. ७ सामन्यांमध्ये ऋतुराजने २ अर्धशतकांसह १९६ रन्स केल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT