Shane Warne Net Worth: शेन वॉर्नची एकूण संपत्ती किती होती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे आज (4 फेब्रुवारी) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. (Shane Warne Death News) हृदयविकाराच्या झटक्याने (Shane Warne Death Reason) थायलंडमध्ये त्याचा मृत्यू झाला. या ऑस्ट्रेलियन लेगस्पिनरच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर लोक त्यांच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल पोस्ट लिहित आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का वॉर्नची जीवनशैली किती शानदार होती आणि त्याची एकूण संपत्ती (Shane Warne Net Worth) किती आहे.

शेन वॉर्नला होती तुफान वेगाने धावणाऱ्या कारची आवड (Shane Warne Love for Cars)

हे वाचलं का?

वॉर्न हा खरं तर आजवरच्या महान फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. पण असलं तरी त्याला खरी आवड ही वेगाची होती. वॉर्नला फेरारी (Ferrari) आणि लॅम्बोर्गिनी (Lamborghini) सारख्या कार खूप आवडत होत्या. त्याने एकदा सांगितलं होतं की त्याच्याकडे 20 कारचे गॅरेज आहे. त्याच्या गॅरेजमध्ये दोन सीटर F-Type जॅग्वार कारही होती.

वॉर्नच्या गॅरेजमध्ये ‘या’ कारही होत्या!

ADVERTISEMENT

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉर्नने कोट्यवधी रुपयांची Bentley Continental Supersports कार देखील खरेदी केली होती. त्याच्याकडे Bugatti Veyron सारखी आलिशान कारही होती. वॉर्नच्या वडिलांना देखील कारची खूप आवड होती. वॉर्नच्या गाड्यांच्या ताफ्यात दोन मर्सिडीज, दोन BMW आणि Holden VK Commodore यांचाही समावेश होता.

ADVERTISEMENT

शेन वॉर्नची एकूण संपत्ती किती? (Shane Warne Net Worth)

शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियन फिरकीपटू जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. विविध मीडिया रिपोर्ट्स आणि Celebritynetworth.com नुसार, वॉर्नची एकूण संपत्ती सुमारे 50 मिलियन डॉलर (सुमारे 385 कोटी रुपये) एवढी होती.

Shane Warne: शेन वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला…

वॉर्नच्या नावावर हा विक्रम

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत 145 सामने खेळले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमधील विकेट्सच्या बाबतीत तो श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (800) नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. वॉर्नने जानेवारी 2007 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती.

कधीही कर्णधार बनू न शकल्याची खंत

शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी 2007 मध्ये खेळली होती. 1999 मध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधारही बनला होता पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. तसं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं आणि आयपीएलच्या पहिल्या सीजनचं विजतेपदही पटकावून दिलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT