सुनील गावस्करांनी आजच्या दिवशी केली होती ‘ती’ खेळी, क्रिकेट चाहत्यांचाही चढला होता पारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लिटल मास्टर सुनील गावस्कर यांचे नाव भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अग्रकमाने घेतलं जातं. 70-80 च्या दशकात ते भारतीय फलंदाजीचा कणा होते. परंतु 47 वर्षांपूर्वी त्यांनी एकदिवसीय विश्वचषकाच्या एका सामन्यात अशी खेळी केली होती, ज्यामध्ये चाहत्यांना एकदिवसीय सामन्यात कसोटी क्रिकेटचा अनुभव आला होता.

ADVERTISEMENT

गावस्कर यांची ती खेळी इतकी संथ होती की, ती पाहून क्रिकेट चाहत्यांच्या संयमाचा संपला होता. 7 जून 1975 रोजी इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्यांनी त्या संथ खेळीची स्क्रिप्ट लिहिली होती. त्यावेळी एकदिवसीय सामना 50 ऐवजी 60 षटकांचा होता. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताचा दारुन पराभव झाला होता.

भारताच्या पराभवात सुनील गावस्कर यांची संथ खेळी आणि त्यांची फलंदाजी चर्चेचा विषय राहिली होती. पहिला एकदिवसीय विश्वचषक 1975 मध्ये खेळला गेला होता. त्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना इंग्लंडशी झाला होता.

हे वाचलं का?

हा सामना 7 जून रोजी होता. ज्यामध्ये सुनील गावस्कर यांनी भारतीय डावाची सुरुवात केली होती. परंतु त्यांनी त्या सामन्यात केलेली खेळी ना सहकारी खेळाडूंना अपेक्षित होती ना क्रिकेट चाहत्यांना. हा सामना पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना मात्र राग अनावर झाला होता.

सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात १७४ चेंडूंचा सामना करत फक्त ३६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांची धावांची सरासरी 21 म्हणजेच 20.69 एव्हढी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गावस्करांच्या त्या खेळीत फक्त एकाच चौकाराचा समावेश होता, त्यामुळे कसोटी सामन्याची अनुभूती आली होती.

ADVERTISEMENT

गावसकरांच्या संथ खेळीने भारताला हा सामना गमवावा लागला होता. भारतीय संघाने 60 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या होत्या. इंग्लंडने हा सामना 202 धावांनी जिंकला होता.

ADVERTISEMENT

इंग्लंडने उभारला होता धावांचा डोंगर

इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या होत्या. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात ही त्यावेळची सर्वोच्च धावसंख्या होती. इंग्लंडकडून डेनिस एमिसने 137 आणि किथ फ्लेचरने 68 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ख्रिस ओल्डने 51 धावांची तुफानी फलंदाजी केली होती.

गावसकरांच्या खेळीने चाहत्यांना राग अनावर

335 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील गावसकर यांनी त्या सामन्यात इतका संथ खेळ केला की चाहत्यांच्या संयमाचा बांध फुटला होता. काही चाहत्यांनी मैदानावरच आपला राग व्यक्त केला होता. काहींनी गावसकर यांचा निषेध ही व्यक्त केला होता.

गावसकर यांच्या खेळीवर फक्त चाहतेच नाहीतर स्वत: सुनील गावसकर देखील खूश नव्हते. अनेक वर्षांनंतर गावसकर यांनी एका मुलाखती दरम्यान या खेळीबद्दल सांगितले होते. मी अनेकवेळा बाद होण्याचा प्रयत्न केला परंतु तसे झाले नाही, अनेकवेळा मी स्टंप सोडून फलंदाजी केली परंतु माझी विकेट पडली नाही असे सुनील गावसकर यांनी सांगितले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT