Ind vs SA Final T20 2024 : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट? हवामानाचा अंदाज काय?
Barbados Weather Forecast: टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. पण या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. शुक्रवारी 28 जूनला ब्रिजटाऊनमध्ये जोरदार पाऊस पडला होता. मात्र सध्या ब्रिजटाऊनमध्ये पाऊस पडत नाही आणि आकाशची ही स्वच्छ आहे.
ADVERTISEMENT
IND vs SA Final, Barbados Weather Forecast: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ब्रिजटाऊन (बार्बडोस) (barbodos kensington oval) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.या सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्याच्या 5 तास हवामान कसे असणार आहे. या दरम्यान पावसाची शक्यता किती असणार आहे? हे जाणून घेऊयात. (t20 world cup 2024 india vs south africa final match weather report barbodos kensington oval pitch report)
ADVERTISEMENT
टीम इंडिया (Team india) आणि साऊथ आफ्रिका (south africa) यांच्यातील अंतिम सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. पण या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. शुक्रवारी 28 जूनला ब्रिजटाऊनमध्ये जोरदार पाऊस पडला होता. मात्र सध्या ब्रिजटाऊनमध्ये पाऊस पडत नाही आणि आकाशची ही स्वच्छ आहे. ही क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने सगळ्यात चांगली गोष्ट आहे.
हे ही वाचा : विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस?
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता (स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30) ब्रिजटाऊनमध्ये पावसाचा अंदाज 50 टक्के आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता ब्रिजटाऊनमध्ये पावसाची 55 टक्के शक्यता आहे. तर 9 वाजता पावसाची शक्यता 57 टक्के आहे. त्यानंतर रात्री 10.00 वाजता 72 टक्के, सकाळी 11 वाजता 56 टक्के आणि मध्यरात्री 12 वाजता 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
..तर राखीव दिवशी सामना खेळवणार
पावसामुळे जर सामन्यावर काहाही परिणाम झाला तर आयसीसीने 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवला आहे, जेणेकरून सामन्याचा निकाल 29 जूनलाच घोषित करता येईल. तरीही 29 जूनला निकाल लागला नाही तर घाबरण्याची गरज नाही. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. 29 जून रोजी पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे किमान 10-10 षटकांचा खेळ शक्य नसेल, तर सामना राखीव दिवशी (30 जून) होईल. राखीव दिवशी, सामना जिथे थांबला तिथून सुरू होईल. एकदा नाणेफेक झाली की सामना 'लाइव्ह' मानला जाईल.
तसेच जर पावसामुळे राखीव दिवशीही सामना झाला नाही आणि 10-10 ओव्हरचाही सामना शक्य नाही झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. उदाहरणार्थ, 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेचे संघ संयुक्त विजेतेपद दिले गेले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चार तास खलबतं, भाजपची विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती ठरली!
दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल.
ADVERTISEMENT
साऊथ आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, बीजो. फॉर्च्युइन, रायन रिकेल्टन.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT