T20 WC: Captain पदाबाबत प्रश्न विचारताच विराट कोहली भडकला…
T20 WC, Virat Kohli: कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, टी-20 वर्ल्डकपनंतर तो टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नानंतर विराट कोहलील चिडलेला पाहायला मिळाला. कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर जेव्हा विराटला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विराट कोहली चांगलाच भडकला. यावेळी विराट कोहली म्हणाला की, ‘मला […]
ADVERTISEMENT
T20 WC, Virat Kohli: कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, टी-20 वर्ल्डकपनंतर तो टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नानंतर विराट कोहलील चिडलेला पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर जेव्हा विराटला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विराट कोहली चांगलाच भडकला. यावेळी विराट कोहली म्हणाला की, ‘मला जे म्हणायचे होते ते मी आधीच सांगितले आहे, परंतु जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा त्या गोष्टीतच डोकावयाचे असेल तर मी काहीही करू शकत नाही.’
कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘मी लोकांना सर्वकाही आधीच सत्य सांगितले आहे, पण जर लोकांना असे वाटत असेल की अजून यामध्ये काही आहे तर तसे अजिबात नाही.’
हे वाचलं का?
#Pakistan Team के खिलाफ हम पूरी तरह तैयार हैं, अभी खेल पर हमारा फोकस है: #ViratKohli | #INDvsPAK #Cricket #T20WorldCup pic.twitter.com/iniDKykoVW
— AajTak (@aajtak) October 23, 2021
विराट कोहलीने पुढे असंही म्हटलं की, ‘आमचे संपूर्ण लक्ष हे सामन्यावर आणि विश्वचषकावर आहे. अशा परिस्थितीत लोकांना अजूनही काहीतरी काढायचे आहे जे खरं तर नाहीच आहे, त्यामुळे मी अशा गोष्टींना अजिबात महत्त्व देत नाही.’
टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने या स्पर्धेनंतर टी-20 फॉर्मेटमधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. विराट कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण तशी अपेक्षाही व्यक्त केली जात होती. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील अंतर्गत धुसफूस यामुळे विराटने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
T20 WC, Ind Vs Pak: कोहली म्हणतो, ‘पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडे गेम चेंजर देखील आहेत’
ADVERTISEMENT
दुसरीकडे बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी विराटच्या या निर्णयावर असं म्हटलं होतं की, ‘विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर मलाही आश्चर्य वाटलं होतं. पण खेळाडू सतत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळत आहेत, कर्णधार म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी सांभाळणं हे फार सोप्पं नसतं.’ दरम्यान, हा निर्णय पूर्णपणे विराट कोहलीचा असल्याचेही सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते.
टी-20 फॉरमॅटमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्यासोबतच विराट कोहलीने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपदही सोडले आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माला टी-20 फॉरमॅटचा कर्णधार बनवले जाऊ शकते अशी सध्या चर्चा आहे. कारण या विश्वचषकात देखील रोहित शर्मा हाच टीम इंडियाचा उपकर्णधार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT