Sachin Tendulkar : ‘आज, मी काहीतरी शिकलो…’,23 वर्षीय खेळाडूचं कौतुक करताना तेंडुलकर असं का म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sachin tendulkar appreciate cameron green efforts
Sachin tendulkar appreciate cameron green efforts
social share
google news

Sachin tendulkar appreciate cameron green efforts : आयपीएल स्पर्धेत नुकताच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 धावांनी सनरायजर्स हैद्राबादचा (Sunrises Hydrabad) पराभव केला. शेवटच्या ओव्हरमध्ये हैद्राबाद 20 धावांची गरज असताना अर्जुनने (Arjun Tendulkar) गोलंदाजीत 5 धावा देऊन मुंबईला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर अर्जुनचे खुप कौतुक झाले.वडिल सचिनला (Sachin Tendulkar) देखील त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटला होता. मात्र अर्जुन व्यतिरीक्त आणखीण एका युवा खेळाडूचे सचिनने कौतूक केले आहे. विशेष म्हणजे या खेळाडूकडून काहीतरी शिकल्याचा अनुभव देखील सचिनने ड्रेसिंग रूममध्ये सांगितला आहे. आता हा ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ शेअर होत आहे. (today i learn something sachin tendulkar appreciate australian cricketer cameron green effory mum vs srh match)

ADVERTISEMENT

खरं तर मुंबईच्या विजयानंतर सोशल मीडियावर अर्जुनचे खुप कौतुक होतेय. या सर्वांत एका खेळाडूची कामगिरी दुर्लक्षितच राहिली. मात्र सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) या खेळाडूची कामगिरीचे कौतुक करून ती उजेडात आणली होती. हा खेळाडू होता 23 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीन (cameron green), ग्रीनने या सामन्यात 64 धावांची सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मुंबई 192 धावांचा डोंगर उभारू शकले होते. या खेळाडूने अहंकार बाजूला ठेवून संघाला प्रथम प्राधान्य देऊन मोठी खेळी केल्याचे सचिन म्हणालाय.

हे ही वाचा : क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग? मोहम्मद सिराजला एका ड्रायव्हरचा संपर्क, दिली पैशाची लालच

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

‘आज, मी काहीतरी शिकलो, आणि मला वाटते कॅमरून ग्रीनकडून (cameron green) प्रत्येकाने हाच संदेश घ्यावा असा सल्ला सचिन तेंडुलकरने मुंबईच्या खेळाडूंना दिला. संघातील कोणीही असेल तोपर्यंत तो (ग्रीन) चेंडू मारू शकतो. पण सुरुवातीचा टप्पा त्याच्यासाठी खडतर होता, त्याने आपला अहंकार आड येऊ दिला नाही. अहंकार ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी चुकीच्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करते. पण संघाच्या हितासाठी त्याने योग्य मार्ग निवडला,असे कौतुक सचिनने केले.

हे वाचलं का?

जर त्याने (ग्रीन) (cameron green) चुकीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला असता, तर तो बाद झाला असता आणि आपण 192 धावांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी मोठ्या, मोठ्या टाळ्यांचा कडकडाट हवा आहे,असे शेवटी कॅमरून ग्रीनचे कौतुक करताना सचिन म्हणालाय. मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 22 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता फॅन्सना आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : WTC : भारताविरुद्धच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची 4 वर्षानंतर मैदानात वापसी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT