Tokyo Olympic 2020 : सुवर्णपदकाच्या शर्यतीतून P.V. Sindhu बाहेर, ताई त्झु यिंगने केला पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुवर्णपदकाच्या आशेने मैदानात उतरलेल्या पी.व्ही.सिंधूचं स्वप्न पुन्हा एकदा भंग पावलं आहे. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर दोन सरळ सेटमध्ये मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संपूर्ण सामन्यावर एका प्रकारे यिंगचं वर्चस्व पहायला मिळालं. पहिला सेट पिछाडी भरुन काढत जिंकल्यानंतर ताई त्झु यिंगने दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे सिंधूला आता कांस्यपदकासाठी खेळावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

पहिल्याच सेटमध्ये ताई त्झु यिंगने आक्रमक सुरुवात केली. पहिले दोन पॉईंट घेत यिंगने सिंधूला आव्हान दिलं. परंतू सिंधूने आपला संयम न ढळू देता चांगलं कमबॅक केलं. कोर्टच्या दोन्ही बाजूला यिंगला पळवत सिंधूने आपली हुमकी रणनिती वापरायला सुरुवात केली. क्रॉसकोर्ट स्मॅश, ड्रॉप, बॅकहँडचा वापर करत सिंधूने सामन्यात आघाडी घेतली. पहिल्या सेटमध्ये सिंधूच्या फटक्यांमध्ये वैविध्य पहायला मिळालं. ताई त्झु ने सिंधूल चांगली झुंज दिली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-८ अशी निसटती आघाडी होती.

मध्यांतरानंतर ताई त्झु न हार न मानता सिंधूला बॅकफूटला ढकलत चांगलं कमबॅक केलं. बॅकहँड आणि बॉडीलाईन स्मॅशचा सढळ हस्ते वापर करत यिंगने पहिल्या सेटमध्ये सिंधूशी ११-११ अशी बरोबरी केली. पुढची काही मिनीटं दोघांमधला खेळ असाच बरोबरीत सुरु होता. यानंतर सिंधूने १६-१४ अशी दोन गुणांची आघाडी घेत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. परंतू यिंगने लागोपाठ दोन गुण घेत पुन्हा सिंधूला बरोबरीत गाठलं. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅली रंगल्या. दोन्ही खेळाडू सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत होत्या, अखेरीस यिंगला यात यश मिळून तिने २०-१८ अशी आघाडी मिळाली. सरतेशेवटी २१-१८ असा पहिला सेट जिंकत यिंगने धमाकेदार सुरुवात केली.

हे वाचलं का?

पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान सिंधूसमोर होतं. परंतू दुर्दैवाने या सेटमध्ये तिची सुरुवात चांगली झाली नाही. परंतू वेळेत स्वतःला सावरत सिंधूने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं. परंतू पहिल्या सेटमध्ये पिछाडी भरुन काढत लिड घेतलेल्या यिंगने सिंधूला दुसऱ्या सेटमध्येही कडवं आव्हान द्यायला सुरुवात केली. ताई त्झु ने पहिल्या सेटप्रमाणे दुसऱ्या सेटमध्येही क्रॉसकोर्ट बॅकहँड फटक्यांचा वापर करत सिंधूला थकवण्यास सुरुवात केली. यिंगच्या याच रणनितीला बळी पडलेल्या सिंधूने मग दुसऱ्या सेटमध्ये चुका करायला सुरुवात केली. सिंधूचे अनेक फटके बाहेर जायला सुरुवात झाल्यामुळे ताई त्झु ला फायदा मिळाला. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत यिंगने ११-७ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटच्या मध्यांतरानंतरही ताई त्झु यिंगने ही आघाडी कायम ठेवली. आपली आघाडी ७ गुणांनी वाढवत यिंगने सिंधूला बॅकफूटला ढकललं. यिंगच्या झंजावातासमोर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूची देहबोली हताश जाणवायला लागली. मध्यला काही क्षणांसाठी सिंधूला एक संधी मिळाली. परंतू क्रॉसकोर्ट फटके खेळण्याच्या नादात सिंधूने पुन्हा चूक करत यिंगची आघाडी आणखी मजबूत केली. यानंतर सामन्यात कमबॅक करत सिंधूला शक्यच झालं नाही. २१-१२ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत ताई त्झु यिंगने अंतिम फेरीत प्रवेश केला.

ADVERTISEMENT

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या यिंगला आतापर्यंत एकदाही ऑलिम्पिक पदक मिळालेलं नव्हतं. २०१२ साली चिनी खेळाडूने तिचं आव्हान संपुष्टात आणलं. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने यिंगवर मात केली होती. त्या पराभवचा बदला घेत यिंगने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT