Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकी संघाची जपानवर ५-३ ने मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरचा साखळी सामना खेळताना यजमान जपान संघावर ५-३ ने मात केली आहे. या विजयासह भारतीय संघाचं बाद फेरीत स्थान निश्चीत झालेलं असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने उर्वरित सामन्यात दमदार कमबॅक करत आपलं आव्हान कायम राखलं.

ADVERTISEMENT

बाद फेरीसाठी प्रवेश निश्चीत झाल्यामुळे भारतीय संघाने या सामन्यासाठी आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन नवोदीतांना स्थान दिलं. नवोदीत खेळाडूंनीही आपल्यावर टाकण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवला. हरमनप्रीत सिंहने १३ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं. पहिल्या सत्रात भारताकडे १-० अशी आघाडी होती.

बॉलवर ताबा, पासवर नियंत्रण, आक्रमण, बचाव अशा सर्वच बाबतीत भारतीय संघाने आज चांगला खेळ केला. दुसऱ्या सत्रात गुरजंत सिंगने १७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी २-० ने वाढवली. जपानच्या संघानेही या सामन्यात सहजासहजी हार न मानण्याचं ठरवलं होतं. १७ व्या मिनीटाला भारताचा बचाव भेदण्यात जपानला यश आलं. केंटा टनाकाने १९ व्या मिनीटाला श्रीजेशला चकवत जपानचा पहिला गोल केला.

हे वाचलं का?

मध्यंतरानंतर तिसऱ्या सत्रात भारताने आपल्या आक्रमणाची धार आणखी वाढवली. परंतू जपानने याला चांगलं प्रत्युत्तर देत भारतावर प्रतिहल्ला केला. कोटा वाटानाबेने ३१ व्या मिनीटाला गोल करत जपानला २-२ अशी बरोबरी साधून दिली. परंतू जपानचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी जपानी गोलपोस्टवर आक्रमण करायला सुरुवात केली. याचाच फायदा घेत समशेर सिंगने ३४ व्या मिनीटाला सुरेख मैदानी गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी मजबूत केली. यानंतर जपानचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. निलकांत शर्माने ५१ तर गुरजंत सिंगने ५६ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी ५-३ वाढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT