Tokyo Olympics 2020 : थाळीफेक प्रकारात कमलप्रीत कौरचं आव्हान संपुष्टात
युवा खेळाडू भारतीय कमलप्रीत कौरचं टोकियो ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. थाळीफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत कमलप्रीत कौरला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. सहा संधींपैकी तीन संधी वाया गेल्यामुळे कमलप्रीत पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली. पात्रता फेरीत ६४ मी. अंतर पार केलेल्या कमलप्रीतने अंतिम फेरीत ६३.७०. मी असं सर्वोत्तम अंतर नोंदवलं. अमेरिकेच्या वेलेरी ऑलमनने सुवर्ण, […]
ADVERTISEMENT
युवा खेळाडू भारतीय कमलप्रीत कौरचं टोकियो ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. थाळीफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत कमलप्रीत कौरला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. सहा संधींपैकी तीन संधी वाया गेल्यामुळे कमलप्रीत पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली. पात्रता फेरीत ६४ मी. अंतर पार केलेल्या कमलप्रीतने अंतिम फेरीत ६३.७०. मी असं सर्वोत्तम अंतर नोंदवलं.
ADVERTISEMENT
अमेरिकेच्या वेलेरी ऑलमनने सुवर्ण, जर्मनीच्या क्रिस्टीनने रौप्य तर क्युबाच्या यामी पेरेझने कांस्यपदकाची कमाई केली.
पात्रता फेरीत ६४ मी. चं अंतर गाठून कमलप्रीत कौरने अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या कमलप्रीत कौरकडून भारतीयांना पदकाची आशा होती. पहिल्याच प्रयत्नात कमलप्रीतने ६१.६२ मी थाळी फेकली. अमेरिका आणि क्युबाच्या खेळाडूने ६८ आणि ६५ मी. अंतराचा टप्पा गाठत पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं.
हे वाचलं का?
खेळाडू जेव्हा दुसऱ्यांना थाळीफेकण्यासाठी तयार झाले त्यावेळी मैदानात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मैदान ओलं झाल्यामुळे अनेक खेळाडूंना दुसरी संधी गमवावी लागली. ज्यात भारताच्या कमलप्रीतचाही समावेश होता. कालांतराने पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्मनीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत कमलप्रीतला ९ व्या स्थानावर ढकललं.
पदकांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी खेळाडूंना पहिल्या ८ स्थानांवर राहणं गरजेचं होतं. आपल्या तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात कमलप्रीतने ६३.७० मी. लांब थाळी फेकत सहाव्या स्थानावर झेप घेत पदकाच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं.
ADVERTISEMENT
पदकांसाठीच्या प्रयत्नात पहिल्या संधीत कमलप्रीत कौरने पुन्हा एकदा निराशा केली. दुसऱ्या प्रयत्नात कमलप्रीतने ६१.३७ मी. लांब थाळी फेकली पण शर्यतीत कायम राहण्यासाठी हे अंतर पुरेसं नव्हतं. क्युबा आणि अमेरिकेच्या खेळाडू आश्वासक कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूला कमलप्रीतची कामगिरी फारशी चांगली होताना दिसत नव्हती. अखेरच्या संधीत पदकाच्या शर्यतीत रहायला कमलप्रीतला किमान ६५ मी. चं अंतर पार करणं गरजेचं होतं. परंतू अखेरची संधी वाया गेल्यामुळे कमलप्रीतचं ऑलिम्पिकमधलं आव्हानही संपुष्टात आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT