Tokyo Olympic : Mirabai Chanu ला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता, चीनच्या खेळाडूची डोप टेस्ट होणार
४९ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूचं पदक सुवर्णपदकात बदललं जाऊ शकतं. याच प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी चीनची खेळाडू झिहुई होऊची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार आहे. होऊला अधिकाराऱ्यांनी जपान न सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिची अँटी डोपिंग टेस्ट होईल हे निश्चीत आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ANI शी बोलताना दिली. […]
ADVERTISEMENT
४९ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूचं पदक सुवर्णपदकात बदललं जाऊ शकतं. याच प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी चीनची खेळाडू झिहुई होऊची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार आहे. होऊला अधिकाराऱ्यांनी जपान न सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिची अँटी डोपिंग टेस्ट होईल हे निश्चीत आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ANI शी बोलताना दिली.
ADVERTISEMENT
शनिवारी झालेल्या या स्पर्धेत चीनच्या होऊने २१० किलो वजन उचलत नवीन विक्रम निर्माण केला होता. मीराबाई चानूने २०२ किलो वजन उचललं होतं. क्लिन अँड जर्क प्रकारात मीराबाईचा तिसरा प्रयत्न फोल ठरला होता. ऑलिम्पिकच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूची उत्तेजक द्रव्य चाचणी सकारात्मक आली तर सिल्वर मेडल मिळालेल्या खेळाडूला सुवर्णपदक दिलं जातं.
आईने दागिने विकून तयार केले Olympic चिन्हाचे कानातले, ५ वर्षांच्या मेहनतीनंतर Mirabai ने स्वप्न सत्यात उतरवलं
हे वाचलं का?
स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने ८७ तर क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचललं होतं. इंडोनेशियाच्या विंडी कँटीकाने १९४ किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली होती. २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने भारताला वेटलिफ्टींग प्रकारात पदक मिळवून दिलं होतं. यानंतर तब्बल २१ वर्षांनी मीराबाई चानूने भारताला या प्रकारात पदकाची कमाई करुन दिली आहे.
त्यामुळे चिनी खेळाडूच्या उत्तेजक द्रव्य चाचणीचा निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
Tokyo Olympic : मीराबाईच्या खांद्यांना बळ देणारे मराठी हात, भारताच्या रौप्यपदकामागचं बदलापूर कनेक्शन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT