विजय हजारे ट्रॉफी : आदित्य तरेचं नाबाद शतक, मुंबईला विजेतेपद
आदित्य तरेचं धडाकेबाज शतक आणि कॅप्टन पृथ्वी शॉच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने उत्तर प्रदेशावर ६ विकेट राखून मात केली. विजयासाठी मिळालेलं ३१३ रन्सचं टार्गेट मुंबईने पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेच्या इनिंगच्या जोरावर सहज पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत मुंबईचा संघ एकही सामना हरलेला नाही. […]
ADVERTISEMENT
आदित्य तरेचं धडाकेबाज शतक आणि कॅप्टन पृथ्वी शॉच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने उत्तर प्रदेशावर ६ विकेट राखून मात केली. विजयासाठी मिळालेलं ३१३ रन्सचं टार्गेट मुंबईने पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेच्या इनिंगच्या जोरावर सहज पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत मुंबईचा संघ एकही सामना हरलेला नाही. मुंबईकडून पृथ्वी शॉने ७३ तर आदित्य तरेने नॉटआऊट ११८ रन्स केल्या.
ADVERTISEMENT
Mumbai Won by 6 Wicket(s) (Winners) #UPvMUM @paytm #VijayHazareTrophy #Final Scorecard:https://t.co/wqWS43I551
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2021
टॉस जिंकून उत्तर प्रदेशने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. माधव कौशिकचं नाबाद शतक आणि समर्थ सिंगचं अर्धशतक या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईच्या बॉलिंगचा चांगलाच समाचार घेतला. उत्तर प्रदेशच्या प्लेअर्सवर अंकुश लावण्यात मुंबईच्या बॉलर्सना यश आलं नाही. माधव कौशिकने १५८, समर्थ सिंग आणि अक्षदीप नाथने ५५ रन्स केल्या. उत्तर प्रदेशने मुंबईसमोर ३१३ रन्सचं आव्हान दिलं.
प्रत्युत्तरादाखल मुंबईनेही चांगली सुरुवात केली. फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत उत्तर प्रदेशाच्या बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरुवात केली. अखेरीस शिवम मवीने पृथ्वी शॉला आऊट करत मुंबईची जोडी फोडली. ठराविक अंतराने यशस्वी जैस्वालही शिवम शर्माच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर मैदानावर आलेल्या आदित्य तरेने पिचवर जम बसवत सामन्यावर मुंबईचं वर्चस्व कायम राखलं. आदित्य तरेला दुसऱ्या बाजूने शम्स मुलानी आणि शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. आदित्य तरेने अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत १८ फोर लगावत ११८ रन्स केल्या. नवीन वर्षातलं मुंबईचं हे पहिलं मोठं विजेतेपद ठरलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT