आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीची घसरण
चेन्नई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर २२७ रन्सनी विजय मिळवला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने जो रुटच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल ४२० धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय प्लेअर्सची दाणादाण उडाली. याच खराब कामगिरीचा टीम इंडियाच्या प्लेअर्सना क्रमवारीत फटका बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पाचव्या स्थानावर घसरला असून […]
ADVERTISEMENT
चेन्नई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर २२७ रन्सनी विजय मिळवला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने जो रुटच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल ४२० धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय प्लेअर्सची दाणादाण उडाली. याच खराब कामगिरीचा टीम इंडियाच्या प्लेअर्सना क्रमवारीत फटका बसला आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पाचव्या स्थानावर घसरला असून इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याव्यतिरीक्त चेतेश्वर पुजाराच्या स्थानातही घसरण झाली असून तो सातव्या स्थानावर घसरला आहे.
? Joe Root enters top three
? Babar Azam, Ben Stokes move up one spot
? Virat Kohli slips to No.5A lot of changes in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting ?
Full rankings: https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/TRwJwuRx88
— ICC (@ICC) February 10, 2021
दुसरीकडे बॉलिंगमध्ये भारतीय बॉलर्सनी आश्वासक कामगिरी केली आहे. रविचंद्रन आश्विन आणि जसप्रीत बुमराह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर पोहचले आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या जेम्स अँडरसनने क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
हे वाचलं का?
? Anderson moves up three spots to No.3
↗️ Ashwin, Bumrah climb upBowlers make significant gains in the latest update of the @MRFWorldwide ICC Test Player Rankings.
Full list: https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/XELbZKy2jY
— ICC (@ICC) February 10, 2021
४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये पहिला सामना जिंकत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सिरीजमधला दुसरा सामना शनिवारपासून चेन्नईच्याच मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चँपिअनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असल्यासं भारतीय संघाला पुढील ३ पैकी किमान २ टेस्ट मॅच जिंकून एक मॅच ड्रॉ करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT