Rahul Dravid ला टीम इंडियाचा प्रशिक्षक बनवू नका, जाणून घ्या कोणत्या खेळाडूने केली मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाचा दौरा पुढे ढकलला आहे. टीम इंडियाच्या या युवा खेळाडूंना राहुल द्रविड मार्गदर्शन करणार आहे. WTC Final मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर रवी शास्त्रींना हटवून त्यांच्या जागेवर राहुल द्रविडला संधी देण्याची मागणी होत होती. परंतू टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफरने राहुलला भारतीय संघाचं पूर्णवेळ प्रशिक्षकपद न देण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर आपल्या भन्नाट मिम्समुळे चर्चेत असलेल्या वासिम जाफरने काही दिवसांपूर्वीच यु-ट्यूब चॅनल सुरु केलं आहे. आपल्या चॅनलवर एका व्हिडीओत बोलत असताना वासिम जाफरने आपली भूमिका मांडली आहे. “राहुल श्रीलंकेत कोच म्हणून गेला आहे, मला खात्री आहे त्याच्या अनुभवाचा फायदा तरुण खेळाडूंना नक्कीच होईल. माझ्यामते राहुल द्रविडला सिनीअर संघाचा कोच बनण्यासाठी दबाव टाकता कमा नये. माझ्यामते राहुल द्रविडने U-19 आणि NCA मध्ये काम करणं गरजेचं आहे. सिनीअर संघात खेळणारे खेळाडू हे तयार झालेले आहेत.”

U-19 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शकाची गरज असते. द्रविड या खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन करु शकतो. त्याच्या अनुभवाची गरज ही U-19 आणि भारत अ संघातील खेळाडूंना जास्त आहे. पुढच्या टप्प्यावर जाताना या खेळाडूंना राहुलसारख्या खेळाडूचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. त्यामुळे द्रविडने NCA मध्ये राहून काम करावं असं मला वाटतं. टीम इंडियाची सध्याची राखीव खेळाडूंची फळी ही मजबुत आहे आणि यासाठी बीसीसीआयसोबत राहुल द्रविडचही तितकच योगदान असल्याचंही जाफर म्हणाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ind vs SL 2021 : Corona चा फटका, श्रीलंका दौऱ्याचं नवीन वेळापत्रक जाहीर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT