Commonwealth Games 2022: सामन्यादरम्यान असं काय घडलं की स्टेडियम रिकामं करावं लागलं?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या सातव्या दिवशी कुस्तीचे सामने अचानक थांबवण्यात आले. बातमीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे. सामने थांबवल्यानंतर स्टेडियम रिकामे करण्यात आले आणि सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंनाही स्टेडियम सोडण्यास सांगण्यात आले. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने ट्विट करून […]
ADVERTISEMENT

कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या सातव्या दिवशी कुस्तीचे सामने अचानक थांबवण्यात आले. बातमीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे. सामने थांबवल्यानंतर स्टेडियम रिकामे करण्यात आले आणि सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंनाही स्टेडियम सोडण्यास सांगण्यात आले. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
स्पीकर पडल्याने गोंधळ
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट करून लिहिले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सामना काही काळासाठी थांबवत आहोत. परवानगी मिळताच आम्ही पुन्हा सामना सुरू करू. इंग्लंडच्या वेळेनुसार 12:15 वाजता सामने सुरू होतील. दिवसभरात पाच सामने झाले. भारताचा दीपक पुनिया 86 किलो गटात पहिला सामना जिंकून परतला होता. पुढचा सामना सुरू होण्याआधीच छतावरून एक स्पीकर मॅटजवळ पडला. यामुळे एकच गोंधळ उडाला.
यानंतर सर्व चाहते आणि खेळाडूंना परत जाण्यास सांगण्यात आले जेणेकरून संपूर्ण स्टेडियमची कसून तपासणी करता आली. स्पीकर मॅटच्या अगदी जवळ पडला होता. अशा परिस्थितीत आयोजकांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एका प्रशिक्षकाने सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षित आहोत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते कसून तपासणी करत आहेत.
We're taking a short pause for a safety check and will resume action once we receive the go-ahead. #WrestleBirmingham
— United World Wrestling (@wrestling) August 5, 2022