Asia cup 2023 : श्रेयस अय्यर वर्ल्ड कप टीममधून होणार बाहेर?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Asia cup 2023 Iyer got injured during practice before the Colombo match against Pakistan. He has stiffness in his back. BCCI had said, 'Shreyas Iyer suffered stiffness in his back during the warm-up before the match.
Asia cup 2023 Iyer got injured during practice before the Colombo match against Pakistan. He has stiffness in his back. BCCI had said, 'Shreyas Iyer suffered stiffness in his back during the warm-up before the match.
social share
google news

Shreyas Iyer, Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप 2023 मध्ये खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता, पण या सामन्याच्या काही तास आधी भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली होती. (shreyas iyer injury update)

स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाने सामन्यापूर्वी दिली. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. नाबाद शतक झळकावणाऱ्या अय्यरच्या जागी केएल राहुलची प्लेईंग-11 मध्ये निवड करण्यात आली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, पाकिस्तान विरुद्धच्या कोलंबोमधील सामन्यापूर्वी अय्यर सरावावेळी जखमी झाला. त्याच्या पाठीत त्रास होत आहे. बीसीसीआयने म्हटले होते की, ‘सामन्यापूर्वी सराव करताना श्रेयस अय्यरच्या पाठीत त्रास सुरू झाला होता.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> संभाजी भिडे धावले शिंदे सरकारच्या मदतीला, मनोज जरांगेंना काय दिला मेसेज?

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, अय्यरची दुखापत गंभीर नाही. बांगलादेशविरुद्धच्या (15 सप्टेंबर) सामन्यापर्यंत तो फिट होऊ शकतो.

मांजरेकरांनी श्रेयसच्या दुखापतीबद्दल व्यक्त केली चिंता

यानंतर चाहते आणि अनेक दिग्गजांना काळजी वाटू लागली. दरम्यान, स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरने याबाबत वक्तव्य केले आहे. नाणेफेकीनंतर तो म्हणाला होता, ‘जर असे असेल (श्रेयस जखमी आहे) तर मला श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आश्चर्य वाटते. तो बराच काळ बाहेर आहे आणि तो आता फीट असल्याचे सांगण्यात आले होते.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार! कसं ते जाणून घ्या

मांजरेकर म्हणाल होते की, ‘पाकिस्तानविरुद्ध (पहिल्या सामन्यात) 14 धावा केल्या तेव्हा तो चांगला दिसत होता. पण आता त्याला पाठीच्या त्रास झाला आहे. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनासमोर अशा समस्या असतील तर त्यांना खेळाडूंकडे लक्ष देणे सुरू करावे लागेल. आम्ही त्याच्या वापसीची वाट पाहत होतो. त्याने पहिला सामना आणि दुसरा सामना खेळला. हे दुर्दैव आहे आणि इशान किशन खेळत आहे याचा मला आनंद आहे.’

ADVERTISEMENT

आशिया कप 2023 मध्ये खेळलेत दोन सामने

श्रेयस अय्यरला अनेक दिवसांपासून पाठदुखालीचा त्रास होता. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. दुखापतीमुळे तो तब्बल 6 महिन्यांनंतर संघात परतला आहे. अय्यरला आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात स्थान मिळाले आहे.

श्रेयसने आशिया चषक 2023 च्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक सामनाही खेळला, ज्यामध्ये त्याने 14 धावा केल्या. याशिवाय अय्यरला या सामन्यात क्षेत्ररक्षणही करावे लागले नाही, कारण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. पण अय्यरने नेपाळविरुद्ध 50 षटके मैदानात घालवली होती. मात्र, यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT