Virat Kohli: ‘सिलेक्टर्सने अगदी कॉल कट करताना सांगितलं.. आता तू वनडेचा कॅप्टन नाही’, विराटने सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Virat Kohli Press Conference Live: मुंबई: वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आल्यानंतर विराट कोहलीने बुधवारी (15 डिसेंबर) प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी विराट कोहलीने अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्याने आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली. ‘मला वनडे संघाचं नेतृत्व (Captaincy) करायचं होतं. पण निवडकर्त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. अगदी शेवटच्या क्षणी कॉल कट करताना त्यांनी मला सांगितलं की, यापुढ तू वनडे संघाचा कर्णधार नाहीस.’ असं विराट कोहली यावेळी म्हणाला.

दरम्यान, काल दिवसभर अशी चर्चा सुरु होती की, वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे गेल्याने नाराज झालेला विराट हा दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळण्यास उत्सुक नाही. मात्र, याबाबत आता स्वत: विराटने स्पष्टीकरण दिलं आहे.

‘मी दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे. मी वनडे मालिकेच्या सिलेक्शनसाठी देखील उपलब्ध आहे. माझ्याबाबत पसरवण्यात येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.’ असं विराट यावेळी म्हणाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कॉल कट करताना सांगितलं तू यापुढे वनडे संघाचा कॅप्टन नाहीस’

विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटविण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. आता स्वत: विराटने सांगितलं आहे की, आपल्याला कशा पद्धतीने कर्णधार पदावरुन हटविण्यात आल्याचं कळविण्यात आलं.

ADVERTISEMENT

विराट म्हणाला, ‘निवड समितीच्या बैठकीच्या फक्त दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. मुख्य निवडकर्त्याने कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. कॉल संपण्यापूर्वी निवडकर्त्यांनी मला सांगितले की मी यापुढे वनडे संघाचा कर्णधार असणार नाही आणि मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर कोणतीही चर्चा झाली नाही.’

ADVERTISEMENT

कसोटी कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले की, ‘जेव्हा मी टी-20 कर्णधारपद सोडले तेव्हा मी बीसीसीआयला सांगितले की, मी टी-20 कर्णधारपद सोडत आहे. त्यावेळी सगळ्यांनी सन्मानाने ही गोष्ट मान्य केली. माझं मत सर्वांनी योग्य पद्धतीने स्वीकारलं. त्यावेळी मी निवडकर्त्यांना सांगितलं देखील की मला, वनडे आणि कसोटीत कर्णधारपद भूषवायचे आहे. पण निवडकर्ते जो निर्णय घेतील त्याला मी तयार आहे. आता निवडकर्त्यांनी घेतलेला निर्णय आपल्यासमोर आहे.’

रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी संघातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मुंबईत सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तीन आठवड्यांचा ब्रेक देण्यात आला आहे. रोहित शर्मा वनडे मालिकेपर्यंत तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कॅप्टन्सी सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी, Virat कडून तरीही निर्णय न आल्याने BCCI कडून नेतृत्वबदल

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ:

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, उमेश यादव, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाळ

  • पहिली कसोटी: डिसेंबर 26-30, 2021, सेंच्युरियन

  • दुसरी कसोटी: 3-7 जानेवारी 2022 जोहान्सबर्ग

  • तिसरी कसोटी: 11-15 जानेवारी 2022, केपटाऊन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT