IPL 2023 Playoffs Scenario : विराट कोहलीमुळे वाढलं रोहित शर्माचे टेन्शन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ipl qualification scenarios 2023 : Royal Challengers Bangalore has reached the fourth position in the IPL 2023 points table.
ipl qualification scenarios 2023 : Royal Challengers Bangalore has reached the fourth position in the IPL 2023 points table.
social share
google news

ipl qualification scenarios 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये एका निर्णायक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. 18 मे (गुरुवार) रोजी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले होते, जे आरसीबीने 4 चेंडू राखून पूर्ण केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरला विराट कोहली. विराटने शानदार शतकी खेळी (100 धावा) केली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून, प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

आरसीबीच्या विजयाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले आहे. हा सामना आरसीबीने गमावला असता, तर मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश केला असता. पण आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफचे समीकरण खूपच रंजक झाले आहे.

हेही वाचा >> Mohsin Khan : वडील आयसीयूमध्ये अन् त्याने गाजवलं मैदान; मोहसीन का झाला भावूक?

आयपीएल 2023 मध्ये आता फक्त पाच शिल्लक राहिले आहेत. परंतु आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्सच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकली आहे. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यातून बाहेर पडले आहेत. उर्वरित सात संघ तिसऱ्या स्थानांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 13 पैकी सात सामने जिंकले आहेत आणि सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला शेवटच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. जर CSK शेवटचा सामना हरली, तर त्यांची मदार मुंबई इंडियन्स, RCB आणि लखनौ सुपर जायंट्स यापैकी एका संघाच्या पराभवावर असेल. चेन्नई सुपर किंग्जचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध (20 मे) आहे.

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपर जायंट्सने गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. लखनौचे 13 सामन्यांत 15 गुण आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना (२० मे) करावा लागणार आहे. जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांना मुंबई इंडियन्स किंवा आरसीबीचा पराभव व्हावा यासाठी प्रार्थना करावी लागेल.

ADVERTISEMENT

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासोबतच मुंबई, सीएसके किंवा चेन्नईने शेवटचा सामना गमावावा, अशी प्रार्थना करावी लागेल. आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट-रनरेट (+0.180) जो मुंबई इंडियन्सपेक्षा चांगला आहे. जर आरसीबीने शेवटचा सामना जिंकला आणि मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थोड्या फरकाने विजय मिळवला, तर फाफ डू प्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये राहील.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “धोनी RCB चा कर्णधार असता, तर तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती”, वसीम अक्रम असं का म्हणाला?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना 21 मे (रविवार) रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी होणार आहे. त्या सामन्यात जर आरसीबीला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, तर ते त्यांच्यासाठी कठीण होऊ शकते. जर मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हरले. यासह पंजाब किंग्जने राजस्थानला थोड्या फरकाने पराभूत केले आणि लखनौने कोलकाताविरुद्ध विजय मिळवला, तर आरसीबी शेवटचा सामना गमावल्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.

मुंबई इंडियन्स

पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स सध्या 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासोबतच, आरसीबी, सीएसके किंवा लखनऊ यापैकी एक संघ त्यांचा शेवटचा सामना हरेल अशी प्रार्थना करावी लागेल. जर मुंबईने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील कारण त्यांचा नेट-रनरेट मायनस (-0.128) मध्ये आहे. मग मुंबईला आशा करावी लागेल की आरसीबी आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने गमावेल, तर पंजाब किंग्जने राजस्थानला कमी फरकाने पराभूत केले आणि लखनौने कोलकाताविरुद्ध विजय मिळवला. मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (21 मे) सामना खेळायचा आहे.

राजस्थान रॉयल्स

2008 च्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. राजस्थानला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजयासह नशिबाची साथ हवी आहे. पंजाबवर विजय मिळवण्याबरोबरच, राजस्थानची मदार मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभूत होतील, यावर असेल. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सला लखनौविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना 19 मे रोजी होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्थितीत शेवटच्या सामन्यातील विजयासोबतच त्यांना अनेक समीकरणे आपल्या बाजूने करावी लागणार आहेत. जर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनौचा पराभव केला तर त्यांना आशा करावी लागेल आणि मुंबई इंडियन्स आणि आरसीबी त्यांचे शेवटचे सामने मोठ्या फरकाने गमावतील. यासह पंजाब किंग्जने राजस्थानविरुद्ध थोड्या फरकाने विजय मिळवावा. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 20 मे रोजी सामना होणार आहे.

Which IPL team qualified in 2023?
गुजरात टायटन्सच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकली आहे.

पंजाब किंग्स

एकदाही विजेतेपद न जिंकलेल्या पंजाब किंग्जचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. म्हणजेच पंजाब किंग्ज 14 गुणांच्या पुढे जाऊ शकत नाही. पंजाब किंग्जला शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (१९ मे) खेळायचा आहे. त्या सामन्यातील मोठ्या विजयाबरोबरच पंजाब किंग्जला प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी त्यांचे शेवटचे सामने गमावले तर नेट-रनरेटच्या आधारावर चौथा संघ निश्चित केला जाईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT