“धोनी RCB चा कर्णधार असता, तर तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती”, वसीम अक्रम असं का म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ms dhoni were rcb captain he would have won 3 ipl trophies
ms dhoni were rcb captain he would have won 3 ipl trophies
social share
google news

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तत्पुर्वी आयपीएलमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पाडतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये सामने जात असून प्रेक्षकांना थरारक सामने पाहता येत आहे. या दरम्यानच आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह (MS Dhoni) धोनीबाबत मोठं विधान केले आहे. या त्याच्या विधानाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ( ms dhoni were rcb captain he would have won 3 ipl trophies wasim akram says)

महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)जर आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरूचा कर्णधार असता तर त्याने आतापर्यंत बंगळूरूला तीनचा चॅम्पियन बनवलं असतं, असे विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) केले आहे. वसीम अकरम पुढे म्हणतात की,आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरू ही टीम मला सर्वांत जास्त आवडते. या संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही आहे. बंगुळुरू तीनदा आय़पीएलचा फायनल सामना खेळली आहे, मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

हे ही वाचा : विराट कोहली-गौतम गंभीरला लाखोंचा दंड? पण, भरणार दुसरेच,’हा’ नियम बघा

विराट कोहली, एबी डिविलियर्स, क्रिस गेल, अनिल कुंबले, डेनियल विटोरी सारखे दिग्गज खेळाडू या संघातून आयपीएल खेळले आहेत. पण तरीही त्यांनी आयपीएल जिंकता आली नाही आहे. एकदाही आयपीएलची ट्रॉफी न जिंकताही बंगळुरूची फॅन फॉलोईंग खुप जबरदस्त आहे.बंगळुरूच्या टीमला खुप पसंत केले जाते त्यामुळे त्यांचे सामने पाहण्यासाठी खुप मोठी गर्दी जमते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) स्पोर्ट्सकीडाशी बातचीत केली. या चर्चेत धोनी आरसीबीचा कर्णधार असता, तर काय झालं असतं? आरसीबीने तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती.आरसीबीकडे विराट कोहली (Virat Kohli) सारखा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पण तरीही त्यांना एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. धोनी असतात तर ते आतापर्यंत जिंकले असते.

आरसीबीचा कर्णधार असताना विराट कुठे मागे राहिला असे अक्रमला विचारले असता तो म्हणाला, ‘तो कुठे मागे पडला हे मला माहीत नाही. तो खूप मेहनती मुलगा आहे. कदाचित तो भारतीय क्रिकेटकडे जास्त लक्ष देत असेल आणि आयपीएलमधील कर्णधारपद कधी कधी तुमच्यासाठी ओझे ठरते. म्हणूनच ते जिथे आहे ते चांगले आहे. तो उत्तम काम करत असून खेळाचा आनंद लुटताना दिसत असल्याचे त्यांनी मत मांडले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले

धोनीला कर्णधारपदाची सवय आहे. विराटला ही सवय होतेय. तो आतून शांत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर काहीही दिसू देत नाही. पण खेळाडूंना याची माहिती आहे. म्हणूनच धोनी हा असा कर्णधार आहे जो आपल्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो,असे देखील वसीम अक्रम म्हणालाय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT