जुन्नरच्या कौशल तांबेला टीम इंडियाचं तिकीट, बांगलादेशविरुद्ध दोन हात करणार
बीसीसीआयने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस U-19 संघासाठी तिरंगी मालिकेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारत अ आणि भारत ब असे दोन संघ सहभागी होणार असून बांगलादेशचा १९ वर्षाखालील संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये मिळून महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली असून यात जुन्नरचा अष्टपैलू खेळाडू कौशल तांबेलाही टीम इंडियाचं तिकीट मिळालं आहे. २८ नोव्हेंबरपासून […]
ADVERTISEMENT

बीसीसीआयने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस U-19 संघासाठी तिरंगी मालिकेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारत अ आणि भारत ब असे दोन संघ सहभागी होणार असून बांगलादेशचा १९ वर्षाखालील संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये मिळून महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली असून यात जुन्नरचा अष्टपैलू खेळाडू कौशल तांबेलाही टीम इंडियाचं तिकीट मिळालं आहे.
२८ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सर्व सामने हे कोलकात्यात खेळवले जातील. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांच्यानंतर टीम इंडियाचं तिकीट मिळवलेला कौशल तांबे हा पुणे जिल्ह्यातला तिसरा खेळाडू ठरला आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला आपला संघ निवडायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने बांगलादेश एकोणीस वर्षाखालील संघाविरुद्ध भारताच्या एकोणीस वर्षाखालील अ आणि ब संघांची तिरंगी मालिका खेळवण्याचे निश्चित केले आहे. विश्वचषकाआधी युएईत युवा संघाचा आशिया चषक खेळवला जाणार आहे, त्या स्पर्धेच्या दृष्टीकोनातूनही भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.