अविनाश जाधव यांच्यानंतर मनसेच्या आणखी एका नेत्याने गाठली अयोध्या
अविनाश जाधव यांच्यानंतर मनसेच्या दिलीप धोत्रे यांनीही अयोध्या गाठली आहे. राज ठाकरे अयोध्येला गेले नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते अयोध्येला जात आहेत. दिलीप धोत्रे यांनी शरयू नदी, हनुमान गढी, तसेच माता सीतेच्या स्वयंपाक घरालाही भेट दिली. श्री रामाचे दर्शन घेतल्यानंतर मन भरून आले असून अंगात एक नवी ऊर्जा निर्माण झाल्याचं मत मनसे नेते दिलीप धोत्रेंनी मांडलंय.

ADVERTISEMENT