
हा फोटो आहे भाजपने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री परिषदेचा. 24 जुलै 2022 रोजी ही बैठक दिल्लीमध्ये पार पडली. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यालयात परिषद आयोजित करण्यात आली, महत्त्वाचं म्हणजे या परिषदेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.