देवेंद्र फडणवीसांच्या होमपिचवर काँग्रेसची मुसंडी | Nagpur

होमपिचवरच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा झटका बसलाय. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी झालीय.

होमपिचवरच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा झटका बसलाय. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी झालीय. नागपुरात काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झालीय, तर भाजपच्या जागा घटल्यात. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधलं ओबीसी आरक्षण अतिरिक्त ठरल्यानं राज्यातील ६ जिल्ह्यांत पोटनिवडणूक होतेय. नागपूरमध्येही जिल्हा परिषदेच्या १६ जागा रद्द झाल्या. रद्द झालेल्या जागांमध्ये काँग्रेसच्या ७, भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी ४ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एका जागेवर ही पोटनिवडणूक झाली.

Related Stories

No stories found.