'मोदींनीही ठरवलं तरी मला संपवू शकणार नाही'; 'घराणेशाही'वरून पंकजा मुंडेंचं विधान

Pankaja munde : बीडमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मांडली घराणेशाहीच्या मुद्द्यावर भूमिका

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घराणेशाही आणि चांगल्या राजकारणाबद्दल केलेल्या विधानानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. पंकजा मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात वंशवाद म्हणजेच घराणेशाहीबद्दल भाष्य केलं. यावेळी पंकजा मुंडेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच नाव घेतलं. त्यामुळे पंकजा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय, असाही प्रश्न उपस्थित होतोय.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "भाजपला वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी पण वंशवादाचं प्रतिक आहे. पण मला संपवू नाही शकत कुणी. म्हणजे मोदीजींनी संपवायचं ठरवलं तर संपवू शकणार नाही, कारण मी तुमच्या मनात राज्य केलं तर. तुमच्या जीवनात मी चांगलं करू शकले तर. तसं आपल्याला राजकारणात स्वच्छता आणाचीये. कारण राजकारणातून महत्त्वाचे निर्णय होतात. त्याच्यासाठी या मुलांना चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात चांगल्या गोष्टी कराव्या लागतील", अशी भूमिका त्यांनी मांडली.

Mumbai Tak
www.mumbaitak.in