शरद पवारांचे राजकीय संकेत, विखेंविरोधात लंकेना बळ

शरद पवारांचे राजकीय संकेत, विखेंविरोधात लंकेना बळ

मुंबई तक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अहनदगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी निलेश लंके यांच्या घरी भेट दिली. मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पवारांचीच यासाठी संमती नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विखे यांनी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढविली. त्यावेळी राष्ट्रवादीने नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि स्वत: पवार यांनीही प्रतिष्ठेची केली. यात मात्र राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी जाणं एक वेगळा राजकीय संकेत आहेत. शरद पवारांची ही कृती निलेंश लंके यांना बळ देणारी मानण्यात येते.

Related Stories

No stories found.