Narayan Rane: शिवसेना भाजप-युतीचा निर्णय ठाकरे-फडणवीस दोघंच घेतील

गुजरात दौऱ्यावर असलेल्या नारायण राणे यांनी शिवसेना भाजप युती झाल्यास मला कोणताच प्रॉब्लेम नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना-भाजप युतीबद्दल महत्त्वाचं विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेना युती पुन्हा होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. या युतीमध्ये नारायण राणे हे मोठा अडथळा असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द नारायण राणे यांनीच युती झाल्यास आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच युतीसंदर्भातला निर्णय हा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसच घेतील, असं स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.