दिल्लीत अमित शाह – देवेंद्र फडणवीस भेटीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना सोबत घेत अमित शाह यांची भेट घेतली. पंकजा मुंडेही सध्या दिल्लीतच आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातला दुरावा पुन्हा बघायला मिळालं. आणि यावेळी तर हा दुरावा दिल्लीतही दिसला. भाजपची राज्यातली पहिल्या फळीतली नेतेमंडळी सध्या दिल्लीत आहेत. पक्षाच्या बैठकांसोबतच ज्येष्ठ नेते, मंत्र्यांशी गाठीभेटी सुरू आहेत. पंकजाही वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. दुसरीकडे फडणवीसही दिल्लीला गेलेत. फडणवीसांच्या नेतृत्वातच मंगळवारी भाजपच्या एका शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा असलेल्या सहकार क्षेत्रातल्या प्रश्नांवर या भेटीत चर्चा झाली. अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीवर चर्चा झाल्याचं फडणवीसांनी या भेटीनंतर सांगितलं. पण देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे यांचा समावेश नसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in