Video : 'फरार' परमबीर सिंग 231 दिवसांनी मुंबईत आल्यावर काय म्हणाले?

परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले असतानाच त्यांच्याविरोधात आणखी तक्रारी समोर आल्यात. दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप होतोय.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त 'फरार' परमबीर सिंग आज मुंबईत दाखल झाले. विमानातून ते मुंबईत आले. गेल्या जवळपास २३१ दिवसांपासून ते फरार होते. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांना परमबीर सिंग शोधत होते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आरोप केला होता. याच प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. तसंच राज्य सरकारने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय आयोगाची नेमणूक केलीय. मुंबई आल्यावर परमबीर सिंग चांदीवाल आयोगापुढेही हजर होणार आहेत. परमबीर सिंग यांच्याशी मुंबई TAK ने केलेली खास बातचीत. परमबीर सिंग मुंबईत आल्यावर काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in