
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर त्यांनी ही बातचीत केली. यावेळी जीएसटी संकलनाबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. सुधीर मुनगंटीवारांच्या रडगाणं करण्याच्या टीकेला उत्तर दिलं. रडण्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘मी कधी रडलो, कधी माझ्या डोळ्यात पाणी आलं...’