Astrology : सूर्य गोचर 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला विशेष असे महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, सूर्य देव हा दर महिन्यात इतर राशींमध्ये आपले स्थान बदलतो आणि त्याचा प्रभाव हा काही राशींच्या लोकांवर होताना दिसतो. 16 जुलै रोजी सूर्य देव हा मिथून राशीतून बाहेर पडून त्यानं कर्क राशीत प्रवेश केला आहे. याचा काही राशींच्या लोकांवर चांगला परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणासह 'या' भागात मान्सून सक्रिय राहणार, पुणे आणि साताऱ्यात काय परिस्थिती?
मिथून राशी
सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्याने त्याचा मिथून राशीतील लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांची खोळंबलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेश दौऱ्याची शक्यता असून तुम्हाला उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत मिळू शकेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच कामाच्या ठिकाणी विकासाचे संकेत चांगले असते.
कन्या राशी
कन्या राशीतील लोकांना या संक्रमणाचा खूप फायदा होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जे लोक बऱ्याचकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी
सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांतता राहील. जुने वाद मिटतील आणि नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल. परीक्षा आणि मुलाखती देणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील, असं ज्योतिषशास्त्राने सांगितलं आहे.
धनु राशी
सूर्य आणि चंद्राच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत निर्माण होणार आहे. शत्रूंपासून जरा सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कौटुंबिक मालमत्ता संबंधित वाद मिटू शकतील आणि घरातील काही शुभ कामेही पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुला बाळांना पती-पत्नींनाही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Personal Finance: फक्त 1000 रुपयांची दरवर्षी गुंतवणूक, तुमच्या मुलांचं कल्याणच होईल!
मेष राशी
मेष राशीच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. घराशी संबंधित मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. भावनिक पातळीवर अस्थिरता मिळण्याची शक्यता आहे. आई आणि वडिलांमुळे कुटुंबाच्या भावना स्थिर असतील.
ADVERTISEMENT
