नवरा म्हणाला, "चल फिल्म बघू..." नंतर असं काहीतरी केलं अन् बायको जोरात ओरडली

Husband Wife: चेन्नईमधील एक जोडपं लग्नानंतर पहिल्यांदाच एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण अचानक सिनेमागृहात नवऱ्याने असं काहीतरी केलं की बायको जोरात ओरडली. नेमकं काय घडलं?

नवरा म्हणाला, "चल फिल्म बघू..." नंतर असं काहीतरी केलं अन्

नवरा म्हणाला, "चल फिल्म बघू..." नंतर असं काहीतरी केलं अन्...(फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

15 Jul 2025 (अपडेटेड: 16 Jul 2025, 12:33 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिनेमागृहात नवऱ्याने नेमकं काय केलं?

point

चित्रपट बघताना बायको जोरात ओरडली...

चेन्नई: लग्नानंतर एकत्र वेळ घालवावा, अशी नवीन लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मात्र, फिरायला गेल्यानंतर चेन्नईमधील एका जोडप्यासोबत एक वेगळीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण अचानक सिनेमागृहात नवऱ्याने असं काहीतरी केलं की बायको जोरात ओरडली. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

चेन्नईमधील मंडईवेली परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या मेल्विन एग्मोर नावाच्या तरुणाचं पट्टिनापक्कमची रहिवासी असलेल्या गायत्रीसोबत लग्न झालं होतं. लग्नाला नुकताच एक महिना झाला होता. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी ते दोघे बाईकवरून पूर्वीच्या महाबलीपुरम मार्गावरील मरीना मॉलमध्ये पोहचले. मॉलमध्ये फिरल्यानंतर नवरा बायकोला म्हणाला, "चल फिल्म बघू...". त्याच्या या बोलण्यावर गायत्री देखील हो म्हणाली आणि दोघे चित्रपट बघण्यासाठी गेले. 

चित्रपट सुरू झाल्यावर काही वेळानंतर...

चित्रपट सुरू झाल्यावर काही वेळानंतर मेल्विनला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या तब्येतीकडे पाहता गायत्री घाबरली. तिने सिनेमागृहातील प्रेक्षकांची मदत मागितली आणि तातडीने तिथल्या लोकांनी मेल्विनला उचलून जवळील रुग्णालयात नेलं. 

मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी मेल्विनचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. हे ऐकून गायत्रीला मोठा धक्का बसला आणि जोरजोरात रडू लागली. आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचं ऐकताच तिला धक्का बसला आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. त्यानंतर गायत्रीला सुद्धा रुग्णालयात भरती करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

हे ही वाचा: पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर

मेल्विनच्या मृत्यूभोवती संशयाची सुई 

प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर मेल्विनचा मृतदेह चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला हा हृदयविकाराचा झटका मानला आणि गुन्हा दाखल केला परंतु पोलिसांकडून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली. उत्तर भारतात लग्नानंतर बायकोनेच आपल्या पतीची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या. 

हे ही वाचा: क्रिकेट खेळताना बॉल बंद घरात... शोधण्यासाठी गेला अन् सापडला मानवी सांगाडा!

अशा घटनांमुळे पोलिसांमध्ये सतर्कता वाढत आहे. त्यामुळे मेल्विनच्या मृत्यूभोवती संशयाची सुई फिरत असल्याचं दिसून येत आहे. हा खरोखर हृदयविकाराचा झटका होता की त्यामागे काही कट आहे? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती मिळाली आहे. गायत्रीच्या मते, मेल्विन पूर्णपणे स्वस्थ असून त्याला कोणताच गंभीर आजार नव्हता. पोलीससुद्धा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. 

    follow whatsapp