क्रिकेट खेळताना बॉल बंद घरात... शोधण्यासाठी गेला अन् सापडला मानवी सांगाडा!

मुंबई तक

हैदराबादमधून एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. क्रिकेट खेळताना बॉल बंद घरात गेला आणि तो शोधण्यासाठी गेलेल्या तरुणाला त्या घरात मानवी सांगाडा सापडला.

ADVERTISEMENT

क्रिकेट खेळताना बॉल बंद घरात... शोधण्यासाठी गेला अन् सापडला मानवी सांगाडा!
क्रिकेट खेळताना बॉल बंद घरात... शोधण्यासाठी गेला अन् सापडला मानवी सांगाडा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

क्रिकेट खेळताना बॉल गेला 7 वर्षे बंद खोलीत

point

बॉल शोधण्यासाठी गेलेल्या तरुणाला सापडला मानवी सांगाडा

हैदराबादमधून एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे नामपल्ली मार्केटजवळ काही तरुण क्रिकेट खेळत असताना चेंडू जवळच्या एका बंद घरात गेला. त्यातील एक तरुण त्या घरात चेंडू शोधण्यासाठी गेला असता त्याला भितीने मोठा धक्काच बसला. त्या ठिकाणी त्या तरुणाला मानवी सांगाडा आढळला. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितलं आणि पोलिसांना सुद्धा याची सूचना दिली. बंद घरात मानवी सांगडा सापडल्यामुळे त्या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तिथल्या स्थानिक लोकांच्या मते, हे घर जवळपास 7 वर्षांपासून बंद होतं. 

फॉरेन्सिक टीमचा तपास 

चेंडू शोधण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तो मानवी सांगाडा स्वयंपाकघरात उलट्या बाजूने पडलेला होता. त्याच्या जवळ बरीच भांडीसुद्धा होती. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी तिथून अनेक नमुने गोळा केले आहेत. हा सांगाडा नेमका कोणाचा आहे? याचं गूढ अधिकच वाढलं आहे. सध्या तो सांगाडा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा: दारू पितो म्हणून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

ते बंद घर नेमकं कोणाचं? 

दक्षिण-पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त चंद्रमोहन यांच्यासह हबीब नगर पोलिसांचे एक पथक त्या बंद घराची चौकशी करत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या घराचा मालक अनेक वर्षांपासून परदेशात राहत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर मुनीर खान नावाच्या व्यक्तीचे असून त्याला 10 मुलं आहेत.

हे ही वाचा: छांगुर बाबाचा मोठा कारनामा! नीतूच्या मुलीचं आपल्या नातवासोबत लग्न; हुंड्यामध्ये 5 कोटीचं...

50 च्या आसपास वय...

त्याचं चौथं मूल त्याच घरात राहत होतं आणि बाकीची मुलं दुसरीकडे राहत होती. मृताचे वय सुमारे 50 वर्षे असल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याची हाडं पूर्णपणे तुटलेली असून तो बऱ्याच वर्षांपूर्वी मरण पावला असावा. पोलीस हत्येच्या दृष्टिकोनातूनही तपास करत असून शरीरावर कोणत्याही प्रकारची झटापट किंवा रक्ताचे डाग आढळलेले नाहीत. हा नैसर्गिक मृत्यू असण्याची शक्यता आहे. या घटनेचे सत्य समोर येण्यासाठी पोलीस आता तिथल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp