छांगुर बाबाचा मोठा कारनामा! नीतूच्या मुलीचं आपल्या नातवासोबत लग्न; हुंड्यामध्ये 5 कोटीचं...
उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या छांगुर बाबाने नीतूच्या मुलीला सुद्धा इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिचं आपल्या नातवासोबत लग्न लावून दिलं. यावेळी हुंडा म्हणून 5 कोटी रुपयांचं शोरूम देण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छांगुर बाबाच्या मोठ्या कारनामाचा खुलासा

नीतूच्या मुलीचं केलं धर्मांतर आणि आपल्या नातवासोबत लावलं लग्न

हुंड्यामध्ये 5 कोटींचं शोरूम ...
Chhangur Baba Case Big Update: उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील बेकायदेशीर धर्मांतर रॅकेट चालवणारा जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबाच्या काळ्या कारनाम्याबद्दल आणखी एक संतापजनक खुलासा झाला आहे. यूपी एटीएसच्या तपासात छांगुर बाबाने त्याची सहकारी नीतू रोहरा उर्फ नसरीन आणि तिचा पती नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन यांच्यासोबत त्यांच्या मुलीला सुद्धा इस्लाम धर्म स्वीकारायला लावला असल्याचं समोर आलं. मुलीचं नाव बदलून सबीहा ठेवण्यात आलं. इतकेच नव्हे तर तिचे छांगुर बाबाच्या नातवाशी लग्न लावण्यात आलं. यावेळी हुंडा म्हणून 5 कोटी रुपयांचं शोरूम देण्यात आलं.
नोव्हेंबर 2015 मध्ये नीतू, नवीन आणि त्यांची मुलगी समाले यांनी दुबईतील अल फारूख उमर बिन खताब सेंटरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. दुबई सरकारच्या इस्लामिक अफेयर्स अँड चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीज डिपार्टमेंट (IACAD) कडून ही प्रक्रिया प्रमाणित करण्यात आली. त्यानंतर तिघांनाही इस्लाम स्वीकारण्याचे म्हणजेच 'सर्टिफिकेट ऑफ इंब्रेसिंग इस्लाम' प्रमाणपत्र देण्यात आले.
धर्मांतरानंतर नीतूचे नाव नसरीन, नवीनचे नाव जमालुद्दीन आणि समालेचे नाव सबिहा असे ठेवण्यात आले. त्यावेळी नीतू आणि तिचे कुटुंब भारतात होते, ज्यामुळे या प्रमाणपत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले.
हे ही वाचा: पुणे तिथं काय उणे! फिर्याद दाखल करणाऱ्यांवर कोयत्याने सपावर वार, नेमका वाद काय?
हुंड्यामध्ये पाच कोटींचं शोरूम...
एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान, छांगुर बाबाने सांगितले की त्याने सबिहाचं लग्न त्याच्या मुलीच्या मुलाशी म्हणजेच नातवासोबत ठरवलं होतं. सबिहा 18 वर्षांची असताना तिचं लग्न ठरवण्यात आलं. या लग्नात 5 कोटी रुपयांचं शोरूम हुंडा म्हणून देण्यात आलं होतं. छांगुर बाबाचा रोहरा कुटुंबाच्या मालमत्तेवर डोळा होता आणि तो या लग्नाच्या माध्यमातून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तपासात आढळून आलं. पुणे आणि बलरामपूरमध्ये रोहरा कुटुंबाची कोट्यवधींची मालमत्ता होती. यामध्ये प्रशस्त बंगले, शोरूम आणि आलिशान वाहनांचा समावेश होता. छांगुर बाबाने आपलं बेकायदेशीर धर्मांतर नेटवर्क मजबूत करण्यासाठी या मालमत्तेचा वापर केला.
हे ही वाचा: एक पती अन् दोन बायका! चोरीचा रचला कट... दोघींचे चक्रावून टाकणारे कारनामे
कोटींचे व्यवहार
यूपी एटीएस आणि ईडीच्या तपासात छांगुर बाबाने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून परदेशी फंडिंगच्या माध्यमातून 100 कोटींहून अधिक रक्कम गोळा केली होती. नीतूच्या आठ बँकांच्या खात्यांमध्ये 14 फेब्रुवारी 2021 ते 28 जून 2021 पर्यंत 13.90 कोटी आणि नवीनच्या सहा बँकांच्या खात्यांमध्ये 34.22 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले. यापैकी एका खात्यात 5 कोटी रुपयांचा परदेशी निधी नोंदवण्यात आला होता. त्यांच्या नेटवर्कला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी छांगुर बाबाने आस्वी एंटरप्रायझेस आणि आस्वी चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्था तयार केल्या होत्या. याद्वारे हा निधी मिळवला जात होता. छांगुर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 40 पेक्षा जास्त वेळा इस्लामिक देशांना भेट दिली होती, ज्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध सिद्ध झाले असल्याचं तपासात समोर आलं.