Mumbai Tak Baithak 2025: मुंबई: महाराष्ट्रातील सर्वच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडतील. त्यामुळे यासाठी आतापासूनच रण पेटलं आहे. अशावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू झालं आहे. या सगळ्या राजकीय रणधुमाळीत मुंबई Tak आपल्यासाठी घेऊन आलं आहे खास 'बैठक'.
ADVERTISEMENT
ज्यामध्ये आपल्याला दिग्गज नेत्यांचं व्हिजन आणि पुढील राजकारण यावरची खुमासदार चर्चा आज (16 जुलै) रोजी ‘मुंबई Tak बैठक’ (Mumbai Tak Baithak) मध्ये पाहायला मिळेल.
मुंबई Tak बैठकचा हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्या विशेष मुलाखती होतील. आज (16 जुलै) सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या सगळ्या मुलाखती आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर LIVE पाहता येत.
'मुंबई Tak बैठक'मध्ये कोण-कोण येणार?
सकाळी 11 वाजता या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले तरूण आमदार रोहित पाटील, स्नेहा दुबे आणि सना मलिक हे असणार आहेत. त्यानंतर त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत दुसरं सत्र पार पडणार आहे.
मुंबई Tak बैठकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
त्यानंतर तिसरं सत्र हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं असणार आहे. या सत्रात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पुढील वाटचाल आणि राज्याती राजकारणात काँग्रेसची भूमिका याबाबत आपली मतं व्यक्त करतील.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके मुंबई Tak बैठकच्या मंचावर
तर चौथं सत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण या सत्रात नुकतीच प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या शशिकांत शिंदे यांच्यासोबत पार पडेल. यावेळी ते त्यांच्या पक्षाचं पुढील व्हिजन नेमकं कसं असेल याविषयी त्यांची मतं व्यक्त करतील. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश हे देखील या सत्रात सहभागी होतील.
मनसे नेते बाळा नांदगावकर मांडणार मनसेची भूमिका
या दोन दिग्गज नेत्यांच्या चर्चा सत्रानंतर सध्या जो पक्ष सर्वाधिक चर्चेत आहे त्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची विशेष मुलाखत पार पडेल. ज्यामध्ये ते मनसेची आगामी भूमिका आपल्यासमोर मांडतील.
मुंबई Tak बैठकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सहावं सत्र हे अधिक विशेष असणार आहे. कारण त्यात स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यापुढे शिवसेनेचं राजकारण कसं करणार याची झलक आपल्याला मुंबई Tak बैठकीत पाहायला मिळेल.
मंत्री छगन भुजबळ होणार सहभागी
मुंबई Tak बैठकीतील सातवं सत्र हे खास असणार आहे. कारण या सत्रासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि कायम चर्चेत असलेले नेते छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
येरे येरे पैसाची टीम मुंबई Tak बैठकमध्ये
दरम्यान, ‘मुबई Tak बैठक’मध्ये सिने क्षेत्रातील काही दिग्गज कलाकार देखील सहभागी होणार आहेत. यावेळी बैठकमध्ये येरे येरे पैसाची संपूर्ण स्टारकास्ट असणार आहे. जे आपल्याशी गप्पा मारतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई Tak बैठकमध्ये!
मुंबई Tak च्या प्रेक्षकांना 13 जुलै रोजी एकाच दिवशी दिग्गज नेत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. असेच एक दिग्गज नेते हे आपल्याला नवव्या सत्रात ऐकायला मिळतील. हे नेते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे असतील. जे मुंबई Tak बैठकीत त्यांची रोखठोक मतं मांडतील
मराठी भाषा आणि त्रिभाषा सक्तीवर चर्चा
मुंबई Tak बैठकीची सुरुवात ही राजकीय नेत्यांच्या मुलाखतीने होणार असली तरीही सध्या चर्चेत असलेला त्रिभाषा सक्ती आणि मराठीचा वापर यावर उहापोह केला जाईल. ज्यासाठी भाषा तज्ज्ञ गिरीश प्रभूणे, दीपक पवार आणि चिन्मयी सुमीत हे त्यांची मतं मुंबई Tak बैठकच्या मंचावरून मांडणार आहेत.
आदित्य ठाकरेंची विशेष हजेरी
मुंबई Tak बैठकीत शिवसेना UBT पक्षाचे आमदार आणि फायरब्रँड नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या ठाकरी शैलीतून नेहमीप्रमाणेच फटकेबाजी करतील. महापालिका निवडणुका हा शिवसेना (UBT) पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशावेळी आदित्य ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई Tak बैठकीला लावणार हजेरी
मुंबई Tak बैठक या कार्यक्रमाची सांगता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्राने होईल. या शेवटच्या सत्रात देवेंद्र फडणवीस हे त्यांचं महाराष्ट्रातील राजकारण आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करतील.
'मुंबई Tak बैठकी'चा हा विशेष कार्यक्रम अजिबात चुकवू नका.. पाहत राहा मुंबई Tak.
ADVERTISEMENT
