Gajkesari Yog 2026 : गजकेसरी योग या योगाच्या नावामध्येच त्याची शक्ती दडलेली आहे. 'गज' म्हणजे हत्ती, जो संपत्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे, तर 'केसरी' म्हणजे सिंह, जो शक्ती आणि नेतृत्वाचे दर्शन घडवतो. या योगाच्या निर्मितीमुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता, पद आणि यशामध्ये वृद्धी होते. चला तर मग जाणून घेऊया की 26 मार्च रोजी निर्माण होणाऱ्या या 'गजकेसरी राजयोगा'मुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Personal Finance: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने आणला नवा नियम
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरु आणि चंद्र एकत्र येतात, तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली योग मानला जातो, जो व्यक्तीला यश, धन आणि समाजात मान-सन्मान मिळवून देतो. द्रिक पंचांगानुसार, 26 मार्च रोजी हा योग जुळून येत आहे, जेव्हा गुरु आणि चंद्र मिथुन राशीत एकाच वेळी विराजमान असतील. याचा परिणाम सर्वच राशींवर होईल. मात्र मिथुन, सिंह आणि कन्या या तीन राशींसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे.
'या' राशींच्या नशीबात आहेत गजकेसरी राजयोगाचे लाभ
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या कुंडलीतील पहिल्या भावात (लग्न स्थानी) तयार होत आहे. यामुळे करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे उत्तम योग जुळून येतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते, तर व्यापाऱ्यांना भागीदारीतून मोठा नफा होईल.
हे ही वाचा : 'देवा भाऊ तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला...', कोण संतापलं एवढं?
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग अकराव्या भावात तयार होत आहे, जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. या काळात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील आणि उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच सरकारी किंवा प्रशासकीय कामात यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योगही या काळात प्रबळ आहेत.
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग दहाव्या भावात तयार होत आहे, जो करिअरशी संबंधित आहे. तुमची प्रलंबित कामे आता पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल. स्वतःची ध्येये गाठण्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचे संकेत आहेत, तर व्यवसायातही चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल.
ADVERTISEMENT











