गणरायाला निरोप देताना डोळे पाणावणार, आज अनंत चतुर्दशी; विसर्जनासाठी 'हा' शुभ मुहूर्त

मुंबई तक

25 Sep 2026 (अपडेटेड: 25 Sep 2026, 08:23 AM)

ganesh visarjan 2026 : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात गणेश विसर्जन होणार आहे. गणरायाच्या विसर्जनाची वेळ आली, भक्तांच्या डोळ्यांत अश्रू अन् मनात आठवणी

ganesh visarjan 2026

ganesh visarjan 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गणरायाला निरोप देताना डोळे पाणावणार

point

आज अनंत चतुर्दशी; विसर्जनासाठी 'हा' शुभ मुहूर्त

Ganesh Visarjan 2026 : राज्यभरात लोकं आज (दि. 25) गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देतील. आज अनंत चतुर्दशी असून गणेशोत्सवाची सांगता होत आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जनाची तयारी सुरू आहे.

हे वाचलं का?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी अनेक सार्वजनिक मंडळांमधील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार काही कुटुंबांमध्ये दीड दिवस, पाचव्या किंवा सातव्या दिवशीही गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडपांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन सामान्यतः अनंत चतुर्दशीला केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला गणेशोत्सवातील महत्त्वाचा दिवस मानले जाते.

हेही वाचा : "इंदिरा गांधी यांच्याविरोधात पसरली होती लाट, मग मोदी आणि शाहा.. ", राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

आज अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन

यंदा चतुर्दशी तिथीची सुरुवात 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी झाली असून 25 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी ती समाप्त होणार आहे. पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आज गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा दिवस आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : "ग्यानेश कुमार 48 तासांत राजीनामा द्या, नाहीतर CJP देशभरात...", दिपकेंचा दिल्लीतून इशारा

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडेही सर्वांचे लक्ष 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा केली जाईल. उत्तर पूजेनंतर दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दुपारी 1 वाजता लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचणार आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रात गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे.