November 2025 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना लवकरच सुरू होत असून, या महिन्यातील ग्रहांची मांडणी तुलनेने शुभ मानली जाते. या काळात काही महत्त्वाचे ग्रह संक्रमण घडणार आहेत, ज्याचा प्रभाव अनेक राशींवर पडणार आहे. चला तर जाणून घेऊया — तूळ ते मीन राशींपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे मासिक राशीभविष्य कसे राहणार आहे ते.
ADVERTISEMENT
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना स्थावर मालमत्तेशी संबंधित कार्यांमध्ये यश मिळवून देणारा ठरेल. घर बांधण्याचे किंवा खरेदीचे तुमचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने प्रगती स्थिर राहील, परंतु नशिबाची साथ मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक चांगल्या घडामोडी घेऊन येणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली काही कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल्यामुळे मन:शांती लाभेल आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
हेही वाचा : बड्या नेत्यांचे घरं सुरक्षित नाहीत, एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, 6 ते 7 तोळे सोनं आणि किती रुपये नेले?
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिना उत्पन्नाचे नवे मार्ग खुली करण्याची शक्यता दर्शवतो. कामाकडे गांभीर्याने पाहिल्यास मोठा फायदा मिळेल. मात्र शिक्षणाशी किंवा मुलांच्या विषयांशी संबंधित अडचणी संभवतात, त्यामुळे संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा आणि योग्य आहाराचे पालन करा.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे. घाईत घेतलेले निर्णय नंतर पश्चातापास कारणीभूत ठरू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या आणि आपल्या जीवनशैलीत संतुलन ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम आणि संवाद आवश्यक आहे.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात. एकमेकांशी संवाद वाढवून नात्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक वाद टाळा आणि नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर दुर्लक्ष करा. संयम आणि समजूतदारपणा राखल्यास परिस्थिती सुधारेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात विशेष सावध राहणे आवश्यक आहे, कारण विरोधक तुमच्यावर मत्सराने वागू शकतात. जोडीदाराशी गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे स्पष्ट संवाद ठेवा. काही जुने मित्र पुन्हा भेटतील आणि ते तुम्हाला मदत करतील. या काळात संबंध अधिक मजबूत करण्याची संधी गमावू नका.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











