मोठी बातमी : फलटणच्या महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं कारण समोर

Satara Crime : फलटणच्या महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलाय. संबंधित महिला डॉक्टरच्या मृत्यू कारण आता समोर आलं आहे.

Satara Crime

Satara Crime

इम्तियाज मुजावर

28 Oct 2025 (अपडेटेड: 28 Oct 2025, 03:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फलटणच्या महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती

point

महिला डॉक्टरच्या मृत्यूचं कारण समोर

फलटण : शहरात काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांना डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल (पीएम रिपोर्ट) प्राप्त झाला असून, या अहवालात मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतेही जखम किंवा आघातांचे खुणा आढळलेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे वाचलं का?

पीएसआय बदनेने मोबाईल लपवला 

या प्रकरणाचा तपास फलटण पोलिसांकडून सुरू असून, मृत डॉक्टर, प्रशांत बनकर आणि पीएसआय बदने यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) पोलिसांच्या हाती लागले आहेत. तपासात असे समोर आले आहे की, मृत्यूच्या काही वेळ आधी डॉक्टर आणि बदने यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. या कॉल रेकॉर्ड्समुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीएसआय बदनेने आपला मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात दिलेला नाही, त्यामुळे त्याच्या फोनचा तपास प्रलंबित आहे. पोलिसांकडून त्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा : बड्या नेत्यांचे घरं सुरक्षित नाहीत, एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, 6 ते 7 तोळे सोनं आणि किती रुपये नेले?

मृत डॉक्टरच्या हातावरील मजकुराचा तपास सुरु 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, बदनेने आपल्या जबाबात मृत डॉक्टरसोबत केवळ मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले आहे. मात्र, दोघांमधील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज तपासल्यानंतरच यामागचं खरं नातं आणि कारण स्पष्ट होणार आहे. तसेच, मृत डॉक्टरने लिहिलेल्या पत्रातील हस्ताक्षर तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, त्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हा अहवाल आल्यानंतर मृत्यू आत्महत्येचा आहे की काही संशयास्पद बाब आहे, याचा उलगडा होणार आहे. फलटण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, डॉक्टरच्या मृत्यूमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आरोप करणं सोपं, चौकशीनंतर सत्य काय? उघडकीस येईल, रणजितसिंह निंबाळकरांबाबत उदयनराजेंनी मांडली भूमिका

    follow whatsapp