मुलं अभ्यास करत नाहीत! फक्त चिडचिड करतात, ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी सांगितले 'हे' उपाय, मुलांचं नशिबच चमकेल!

Astrology News : एका छोट्याशा गावात पंकज आणि त्याची पत्नी रेखा (काल्पनिक नाव) राहत होते. त्यांचा मुलगा आदित्यचं अभ्यासात मन लागत नव्हतं.घरातही पालकांमध्ये तालमेल राहत नव्हतं.

Tips For Children Progress (फोटो - AI)

Tips For Children Progress (फोटो - AI)

मुंबई तक

02 May 2025 (अपडेटेड: 02 May 2025, 09:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलांसोबत चांगला संवाद ठेवण्यासाठीचे उपाय कोणते?

point

मुलांचा चिडचिडपणा ठीक करण्यासाठीचे उपाय कोणते?

point

मुलांच्या प्रगतीसाठीचे उपाय, जाणून घ्या सविस्तर माहिती

Astrology News : एका छोट्याशा गावात पंकज आणि त्याची पत्नी रेखा (काल्पनिक नाव) राहत होते. त्यांचा मुलगा आदित्यचं अभ्यासात मन लागत नव्हतं.घरातही पालकांमध्ये तालमेल राहत नव्हतं. पंकज आणि रेखा तणावात होते. कारण आदित्य मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हता.त्याच्या जीवनात प्रगती होत नव्हती. एक दिवास गावातील प्रसिद्ध ज्योतिषी आले. पंकज आणि त्यांची पत्नी रेखाने त्यांच्यासोबत चर्चा केली आणि समस्या सांगितल्या.त्यानंतर ज्योतिषींनी त्यांना जबरदस्त उपाय सांगितले आणि आदित्यच्या जीवनात बदल होऊ लागला.

हे वाचलं का?

तो अभ्यास करू लागला आणि घरातही शांततापूर्ण वातावरण निर्माण झालं. जर तुमच्या मुलासोबतही अशाचप्रकारचं काहीसं घडत असेल, त्याला जीवनात यश मिळत नसेल, तर ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय तुमच्या कुंडलित बृहस्पती आणि पंचम भाव मजबूत करण्यासाठी मदत करतात. यामुळे मुलांच्या समस्या दूर होऊ शकतात. हे उपाय कोणते आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मुलांसोबत चांगला संवाद ठेवण्यासाठीचे उपाय

जर मुलांसोबत चांगला संवाद होत नसेल, तर दररोज सूर्यदेवाला हळदीचं पाणी अर्पण करावं. सकाळी लवकर हे कार्य करणं खूप लाभदायक होईल. त्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. ॐ भूर भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्,या मंत्राचा जप केल्याने मुलांसोबत तुमचं नातं चांगलं राहील.

हे ही वाचा >>  मुंबई इंडियन्सच्या 'या' अष्टपैलू खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा! तरुणीसोबत शारीरिक संबंध केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

मुलांचा चिडचिडपणा ठीक करण्यासाठीचे उपाय

जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यासोबत चिडचिड करत असेल, तर प्रत्येक गुरुवारी हळदी पावडर पाण्यात भिजवून भगवान श्रीकृष्णांच्या चरणाला लावा. यानंतर क्लीं कृष्णाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. 

मुलांच्या प्रगतीसाठीचे उपाय

जर तुमच्या मुलाला मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर त्याने गुरुवारी भगवान शंकराला पिवळं फूल अर्पण करावं. शिवलिंगावर किंवा घरात शंकर देवाला हे फूल वाहा आणि नम: शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. परंतु, पिवळा फूल फक्त गुरुवारीच वाहा. यामुळे मुलाच्या जीवनात प्रगती होईल.

टीप - भविष्याबाबतची माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

हे ही वाचा >> खात्यात अचानक येऊ लागले पैसे... थेट 71 हजार 500 रुपयांचा फायदा, तुम्ही अकाउंट तपासा!

    follow whatsapp