कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या; राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूला कुणी संपवले?

मुंबई तक

25 May 2026 (अपडेटेड: 25 May 2026, 11:57 AM)

Rajasthan Crime News: एका राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडूचा मृतदेह रस्त्याकडेला सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या

point

राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूला कुणी संपवले?

Crime News : राजस्थानचा 21 वर्षीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू मोनु याची हरियाणात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोनु हा राजस्थानमधील भिवाडी येथील सैदपूर गावचा रहिवासी असून त्याने खेळात अनेक पदकेही जिंकली होती. या क्रूर घटनेने संपूर्ण क्रीडा जगतासह सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनुला तब्बल तीन दिवस ओलीस ठेवून अमानुष यातना देण्यात आल्या. लोखंडी रॉड, काठ्यांनी झालेल्या बेदम मारहाणीत अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपींनी मारहाण करून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

हे वाचलं का?

प्रेमसंबंधातून हत्या?

या हत्येमागे प्रेमसंबंधांचे कारण असल्याचे समोर आले आहे. मोनुचे फरीदाबादमधील तिगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबत गेल्या आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबाचा या संबंधांना कडाडून विरोध होता. महिनाभरापूर्वी ती मुलगी घर सोडून निघून गेल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मोनुविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी ती मुलगी दिल्लीत सापडली, तरीही दोन्ही कुटुंबांमधील वाद मिटला नव्हता. 17 मे रोजी मोनु पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्यासाठी फरीदाबादला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता, मात्र तिथे पोहोचताच मुलीच्या नातेवाईकांनी त्याचे वाटेतूनच अपहरण केले.

हे ही वाचा : टॉयलेटमध्ये अडकलं नवजात बाळ, 14 वर्षीय आईनं हे काय केलं?

अमानुष मारहाण अन् मृत्यू

अपहरण केल्यानंतर मोनुला शेतातील एका घरात आणि ट्यूबवेलवर डांबून ठेवण्यात आले. तिथे तीन दिवस त्याला पाशवी मारहाण करण्यात आली, अशी माहिती पोस्ट मार्टममधून समोर आली आहे. या धक्कादायक अहवालानुसार, मारहाणीमुळे मोनुच्या डोक्याची आणि नाकाची हाडे तुटली होती, तर छातीच्या बरगड्या थेट फुफ्फुसात घुसल्या होत्या. संपूर्ण शरीरावर खोल जखमांच्या खुणा होत्या. त्याची प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर आरोपी त्याला रस्त्यावर फेकून पसार झाले. या हत्येप्रकरणी फरीदाबाद पोलिसांनी 3 महिलांसह एकूण 15 जणांविरुद्ध अपहरण, हत्या आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू केली आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीची संधी, पात्रतेचे निकष काय?

सुनियोजीत कट

या घटनेमुळे सैदपूर गावात आणि क्रीडा जगतात तीव्र शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी याला सुनियोजित कट रचून केलेली हत्या म्हटले आहे. मोनुच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तथाकथित प्रतिष्ठा आणि नात्यांच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांच्या या कृत्याने पुन्हा एकदा समाजातील क्रूरता आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.