अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली अर्थव्यवस्था 'मृत' (Dead economy) आहे आहे असं म्हणत भारताला डिवचलं. रशियासोबत राहून आपण बुडू. भारत रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदी करत आहे याचा त्यांना राग आहे. ट्रम्प यांचे उद्दिष्ट यशस्वी झाले, कारण त्यांच्या याच विधानावरून वादविवाद सुरू झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने दहा वर्षांत अर्थव्यवस्था मारली आहे. तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, आपण लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. जग आपली ताकद स्वीकारत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील या लढाईत सत्य ब्लॅक अँड व्हाइट नाही.
ADVERTISEMENT
हे खरे आहे की, भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे. जपान, चीन आणि अमेरिका आपल्या पुढे आहेत. दहा वर्षांपूर्वी आपण 11 व्या क्रमांकावर होतो. हे देखील खरे आहे की, आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. पण चांगली बातमी इथवरच आहे.
आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे पण आपले लोक जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत नाहीत. दरडोई उत्पन्नात आपला क्रमांक 140 आहे. आणखी एक युक्तिवाद केला जात आहे की, आपली वाढ अमेरिकेपेक्षा तिप्पट आहे. आपण हे विसरतो की अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा सात पट मोठी आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था $28 ट्रिलियन → दरवर्षी 2% वाढ → दरवर्षी $560 अब्ज डॉलर्स जोडले जातील
भारताची अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन → दरवर्षी 7% वाढ → दरवर्षी $280 अब्ज डॉलर्स जोडले जातील
भारत आणि अमेरिकेत तुलना करता येत नाही, परंतु याचा अर्थ असाही नाही की आपली अर्थव्यवस्था मृत (Dead) आहे. आपली समस्या असमानता आहे, पूर्वीही याबाबत मी लिहिले होते की, भारतात तीन भारत आहेत. Blume च्या Indus Valley Report म्हटले आहे की, भारतात 100 कोटी लोक आहेत ज्यांच्याकडे खर्च करण्यासाठी काहीही शिल्लक नाही. येथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब आहे की, सरकार स्वतः 84 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा दावा करतं. अहवालानुसार, भारतात तीन भारत आहेत.
भारतातील 3 भारत
भारत 1 मध्ये 14 कोटी लोक आहेत ज्यांचे दरडोई उत्पन्न $15 हजार म्हणजे सुमारे 13 लाख रुपये आहे. लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत हा देश मेक्सिकोसारखा आहे. हे लोक भारतातील वापराच्या दोन तृतीयांश खर्च करतात. जर देशाची लोकसंख्या 100 असेल तर त्यामध्ये अशाप्रकारे दरडोई असलेली ही 10 लोकं तिथे आहेत. जर देशाचा वापर 100 रुपये असेल तर हे दहा लोक 66 रुपये खर्च करतात.
भारत 2 मध्ये 30 कोटी लोक आहेत. लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत, ते इंडोनेशियाच्या जवळ आहे. त्याचे दरडोई उत्पन्न $ 3 हजार आहे. हे लोक देशाच्या वापराच्या एक तृतीयांश खर्च करतात.
भारत 3 मध्ये 100 कोटी लोक आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न $ 1 हजार आहे. हे आफ्रिकेतील गरीब देशांच्या उत्पन्नासारखे आहे. Indus Valley Report म्हटले आहे की, या लोकसंख्येकडे खर्च करण्यासाठी अतिरिक्त काहीही नाही.
ट्रम्प आपल्याला चिडवत आहेत पण जर भारताला विकसित देश बनवायचे असेल तर भारत 2 आणि भारत 3 मध्ये अधिक प्राण ओतावे लागतील. केवळ भारत 1 पाहून आपण असे म्हणू शकत नाही की आपली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे.
ADVERTISEMENT
