पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?

Artificial intelligence यामुळे जगभरात कोणाकोणाच्या नोकऱ्या जातील याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोणकोणत्या नोकऱ्यांना AI मुळे धोका आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

paisa pani blog milind khandekar know whose jobs will ai take whose jobs will it save

पैसा-पाणी विशेष ब्लॉग

गेल्या आठवड्यात, मी पाकिस्तानच्या Dawn या इंग्रजी वृत्तपत्रातील एक Clip शेअर केली होती. त्या वृत्तपत्राने कार विक्रीबद्दल एक बातमी प्रकाशित केलेली. शेवटी, ChatGPT शैलीचा एक प्रॉम्प्टही छापला गेला होता. ज्यामध्ये ChatGPT म्हटलं होतं की, मी ही बातमी फ्रंट पेजसाठी बनवू का?

हे वाचलं का?

आता दोन शक्यता आहेत. ChatGPT ला एक प्रेस नोट दिली गेली असेल आणि त्यावरून बातमी लिहिण्यास सांगितले असेल किंवा रिपोर्टरच्या कॉपी डेस्कने ती एडिट करण्यासाठी ChatGPT ला दिली  असेल. पण यासगळ्यामुळे आता वृत्तपत्राची खिल्ली उडवली जात आहे. तर आज आपण पैसा-पाणी या विशेष सदरात चर्चा करूयात नोकऱ्यांमधील AI बद्दल. AI हा आपला भागीदार होईल की त्यामुळे आपल्या नोकऱ्या जातील?

EY ने भारतातील नोकऱ्यांवर AI चा काय परिणाम होईल यावर एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, 5 वर्षांत अंदाजे 4 कोटी (38 मिलियन) नोकऱ्या बदलतील, म्हणजेच हे लोक आज जे काम करत आहेत ते आता पूर्वीसारखे राहणार नाही. याचा सर्वाधिक परिणाम तीन क्षेत्रांवर होईल. रिटेल, फायनान्स आणि आयटीमध्ये सर्वात जास्त बदल होण्याची शक्यता आहे.

मी ChatGPT ला विचारले की, कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या गमावल्या जाऊ शकतात आणि कोणत्या टिकू शकतात. हे मूल्यांकन NITI आयोग, Microsoft आणि EY सारख्या विविध संशोधन अहवालांवर आधारित आहे.

कोणाच्या नोकऱ्या आहेत धोक्यात?

  • ग्राहक सेवा - ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या कॉल सेंटरची जागा AI वेगाने घेत आहे. जर तुमची ऑर्डर उशीरा आली किंवा चुकीच्या पद्धतीने वितरित झाली तर Chat bot प्रथम तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो. आवश्यकतेनुसारच कोणीतरी फोनवर बोलण्यासाठी येतं. कंपन्यांना अनेकदा अशाच तक्रारी येतात आणि त्या कशा सोडवायच्या हे त्यांना माहिती असते. हे काम करण्यासाठी AI ला प्रशिक्षण दिले जात आहे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर - आता डेटा एंटर करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता नाही. AI हे अकाउंटिंग क्लर्कचे मूलभूत काम करत आहे. भविष्यात यामध्ये अधिक सुधारणा होईल. पूर्वी, हिशोबाच्या वह्यांमध्ये नोंद व्हायची. नंतर, तीच गोष्ट कम्प्युटरमध्ये प्रविष्ट केली जाऊ लागली. या कामासाठी लोकांना नियुक्त केले जात होते, परंतु आता कॉम्प्युटप ते स्वतः करू शकतं.
  • लेखन/भाषांतर - AI लेखन आणि भाषांतराची जबाबदारी घेत आहे. पूर्वी, भाषांतर एजन्सी हे काम करत असत, लोकांना रोजगार देत असत. हे काम माध्यमांमध्ये देखील केले जात असे. हे काम कमी होत राहील.

कोणाच्या नोकऱ्या टिकतील?

  • फील्ड टेक्निशियन - असे काम ज्यामध्ये तुम्हाला स्वत: जावं लागतं, जसं की, एसी मेकॅनिक, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यासारखे.
  • नर्सिंग - डॉक्टरांच्या कामात AI व्यत्यय आणू लागला आहे, परंतु AI काळजी घेणे किंवा रक्ताचे नमुने गोळा करणे अशी कामं करू शकत नाही.
  • रिलेशनशिप मॅनेजर - बँका किंवा वित्त कंपन्यांमध्ये, ग्राहकांच्या समस्या सोडवणे किंवा सल्ला देणे हे काम तुमच्याकडे राहील. रिटेल स्टोअरमध्ये तुम्हाला मदत करणारे सेल्समन.

जर तुमचे काम दररोज सारखेच किंवा  Repetitive असेल, तर AI ते पॅटर्न शिकू शकतं. पण, जिथे फील्ड वर्क मॅन्युअली करण्याची शक्यता जास्त असते, तिथे AI ला ते लगेच करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे नोकऱ्या गमावण्यापेक्षा त्यांचं स्वरूप बदलण्याची शक्यता जास्त असते, म्हणून AI शिकत राहा. AI सोबत तुमचा मेंदू वापरा, अन्यथा तुम्ही Dawn वृत्तपत्रासारखी चूक होऊ शकते.

    follow whatsapp