Personal Finance Investment Tips: कमी पगार असल्याने अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तसेच त्यांना त्यांची स्वप्नेही पूर्ण करायची असता. परंतु महिन्याला 30 हजार रुपये कमवणारे देखील हळूहळू श्रीमंत होऊ शकता. कोणतेही अतिरिक्त उत्पन्न किंवा सेव्हिंग्स नसतानाही, तुम्ही सहजपणे एक मोठा फंड उभारू शकता.
ADVERTISEMENT
राजेश नावाच्या मुलाने त्याचे वीकेंड डिनर आणि आउटिंग सोडले नाही. पण 30 हजार रुपये मासिक पगार असतानाही तो हळूहळू श्रीमंत झाला. हे नेमकं कसं घडलं याबाबत सविस्तर जाणून घ्या.
'या' फॉर्म्युल्याचा करा वापर
राजेश एक सामान्य नोकरदार आहे, परंतु त्याने 50-25-25 बजेटिंग पद्धत स्वीकारली आहे, जी जुन्या 50-20-30 फॉर्म्युल्याचीच एक सोपी आवृत्ती आहे. ही पद्धत जीवनाला कठोर नियमांमध्ये बांधत नाही, तर त्याऐवजी आनंद आणि नियोजन संतुलित करते. राजेशचा पगार दरमहा 30 हजार रुपये आहे.
आता फॉर्म्युल्यातील सगळ्यात आधी 50 टक्के म्हणजे 15 हजार रुपये आवश्यक गोष्टींवर तो खर्च करतो. यामध्ये भाडे 7 हजार, किराणा सामान 3500 रुपये, वीज, पाणी आणि इतर गोष्टी २ हजार, प्रवास खर्च 1500 रुपये आणि कपडे आणि इतर मूलभूत वस्तू 1 हजार रुपये यांचा समावेश आहे. राजेश त्याचे सर्व खर्च काळजीपूर्वक व्यवस्थापित करतो जेणेकरून गुंतवणूक करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
नंतर 25 टक्के म्हणजे 7500 रुपये तो आपल्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करतो. यामध्ये स्कूटरचा 3 हजार रुपये EMI, आठवड्याच्या शेवटी सुट्टीसाठी 1000 रुपये, वार्षिक सहलींसाठी 2500 रुपयांची बचत आणि पुस्तके किंवा इतर वैयक्तिक गोष्टींसाठी 1000 रुपयांची बचत करतो. राजेशचा असा विश्वास आहे की, पैसे फक्त उदरनिर्वाहासाठी नाहीत तर आनंदासाठी देखील आहेत. म्हणूनच, तो कधीही त्याचे विकेंड डिनर किंवा काही गोष्टी डावलत नाही.
गुंतवणूक कशी करायची?
सर्वात महत्वाचे 25 टक्के किंवा 7500 रुपये गुंतवणूकीसाठी आहेत. यामधून आपल्याला राजेशचे स्मार्ट नियोजन दिसून येईल. तो २,००० रुपये आपत्कालीन फंड, 1000 रुपये आरोग्य विम्यात, 1000 रुपये टर्म इन्शुरन्समध्ये आणि उर्वरित 3500 रुपये SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो. 12 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, त्याची गुंतवणूक 5 वर्षांत अंदाजे 2.8 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. यावरून असे दिसून येते की, लहान बचत देखील कालांतराने मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राजेश कधीही फार ताण घेत नाही पण तो फक्त स्वत:च्या पैशांचे योग्य नियोजन करतो.
प्रत्येकाला वाटते की त्यांचा पहिला पगार खूप कमी आहे, परंतु जर तुम्ही सुरुवातीपासूनच शहाणपणाने गुंतवणूक करण्याची सवय लावली तर भविष्यात तुमची संपत्ती अतुलनीय असेल. यावरून आजच्या तरुण पिढीला हे शिकवले पाहिजे की बजेटिंग म्हणजे आनंद वाया घालवणे नाही तर हुशारीने जगणे आहे.
ADVERTISEMENT











